आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पतौडी घराण्याचा वारस तैमूर अली खान आज 4 वर्षांचा झाला आहे. सैफ आणि करीना कपूर खानचा मुलगा तैमूर गेल्या 4 वर्षांपासून पैपराजींचा आवडता स्टार किड असून त्याची छायाचित्रे आणि त्याच्याशी संबंधित बातम्या नेहमीच चर्चेत असतात. सैफ आणि करीनाने तैमूरच्या जन्मासोबतच त्याच्या नावाची घोषणा केली होती. मात्र चिमुकल्याच्या नावावरुन चांगला वादंग उठला होता. अनेकांनी सैफ-करीनाचा मुलगा तैमूरच्या नाववर आक्षेप नोंदवला होता.
खरं तर तैमूर लंग हा एक इस्लामिक राजा होता. आपले साम्राज्य जगभर करण्यासाठी त्याने जगावर हल्ले केले होते. त्याला क्रूरकर्माही म्हणायचे. भारतावरही त्याने हल्ला करुन असंख्य लोकांना ठार मारले होते. तैमूरचा मृत्यू 1 एप्रिल 1405 रोजी झाला. त्याला उज्बेकिस्तानमध्ये दफन करण्यात आले होते.
अलीकडेच वी द वूनम या ऑनलाइन सत्रादरम्यान करीनाने तैमूरच्या नावामुळे झालेल्या वादावर आपले मौन सोडले. करीनाने सांगितल्यानुसार, माझ्या बाळाच्या नावामुळे जो वाद निर्माण झाला होता, त्यामुळे एक आई आणि एक माणूस म्हणून मी खूप घाबरली होती. करीना पुढे म्हणाली, "मी हे कधीही विसरू शकत नाही कारण हा एक अतिशय भयावह अनुभव होता. माझ्या मुलाचे नाव काय असायला हवे, हा सर्वस्वी माझा निर्णय आहे आणि त्याच्याशी इतरांचे काही देणेघेणे नाही,' असे मत करीनाने व्यक्त केले.
जन्माच्या आठ तासांनी सुरु झाला होता वाद
ती पुढे म्हणाली, 'माझी प्रसूती होऊन आठ तास देखील झाले नव्हते. आम्ही बाळ झाल्याच्या आनंदात होतो. इतक्यात एक प्रसिद्ध व्यक्ती मला भेटायला आली. त्यांनी माझी आणि बाळाची चौकशी करायच्या आधी तू बाळाचे नाव असे का ठेवले? असा प्रश्न मला विचारला. ते ऐकून मी हादरले. तो व्यक्ती मला बडबडू लागला. त्यानंतर आम्ही त्यांना तेथून जायला सांगितले. मात्र त्यानंतर मी ढसाढसा रडले होते. बराच वेळ रडल्यानंतर मी ठरवले की हे माझे बाळ आहे आणि याचे नाव काय ठेवायचे ते मी ठरवणार. कुणी कितीही टीका केली तरी मी त्याच्याकडे लक्ष देणार नाही.'
नाव इतिहासावर नव्हे तर अर्थावर ठेवले होते
करीनाने सांगितले की, सैफ आणि तिने इतिहासाच्या आधारे नव्हे तर नावाच्या अर्थामुळे तैमूर या नावाची निवड केली होती. करीना म्हणाली, आम्ही त्याचे नाव तैमूर ठेवले, कारण आम्हाला ते आवडले. मला जर मुलगा झाला तर त्याचे नाव तैमूर असेल, हे मी आधीच ठरवले होते. तैमूर या शब्दाचा अर्थ लोह किंवा लोखंड होतो. त्यामुळे माझा मुलगा लोहपुरुष असेल, असे मी सैफला सांगितले होते, असे करीनाने यावेळी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.