आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपी बर्थडे उर्मिला मातोंडकर:वयाच्या 6 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत आली, रामागोपाल वर्माच्या एका हट्टाने उद्धवस्त झाले करिअर, राजकारणातही मिळाले नाही यश

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रामू आपल्या प्रत्येक चित्रपटात उर्मिलाला घेत होते.

रंगीला, जुदाई आणि खुबसुरत यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज आपला 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. उर्मिला यांनी 1980 मध्ये 'कलयूग' या चित्रपटात बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र 'मासूम' या चित्रपटातील भूमिकेमुळे त्यांना बाल कलाकार म्हणून ओळख मिळाली होती. नायिका म्हणून त्यांचा पहिला चित्रपट 'नरसिम्हा' हा होता. पण राम गोपाल वर्मांच्या 'रंगीला'मुळे उर्मिला सिनेसृष्टीत स्टार म्हणून उदयास आल्या. 'रंगीला' या चित्रपटात एकत्र काम करत असताना राम गोपाल वर्मा उर्मिला यांच्या प्रेमात पडले होते. इतकेच नाही तर रामू आपल्या प्रत्येक चित्रपटात उर्मिलाला घेत होते.

एका निर्णयामुळे करिअर झाले उद्धवस्त
राम गोपाल वर्मा यांच्याच चित्रपटात काम करत असताना उर्मिला यांनी इंडस्ट्रीतील अनेक दुस-या दिग्दर्शकांसोबत काम करण्यास नकास दिला होता. शिवाय रामू यांचेही इंडस्ट्रीतील लोकांशी फारसे पटत नसल्याने दिग्दर्शकांनीही उर्मिलाला चित्रपटात घेणे बंद केले. हळूहळू उर्मिला यांना चित्रपट मिळणे बंद झाले आणि त्यांचे करिअर उध्वस्त झाले.

रिपोर्ट्सनुसार, एकदा उर्मिलासाठी राम गोपाल वर्मा यांनी माधुरी दीक्षितला त्यांच्या चित्रपटातून काढून टाकले होते. या घटनेनंतर रामू उर्मिला यांच्या प्रेमात असल्याने ते उर्मिलालाच चित्रपटात हिरोईन म्हणून घेतात, यावरुन पडदा उचलला गेला होता. ही गोष्ट जेव्हा उर्मिला यांना समजली, तेव्हा त्यांनी रामू यांचे प्रपोजल फेटाळून लावले होते. इतकेच नाही तर उर्मिला यांनी राम गोपाल वर्मांबरोबर चित्रपट करणेही बंद केले होते.

रामूने साऊथच्या चित्रपटांतही केले होते कास्ट

'रंगीला'पूर्वी राम गोपाल वर्मा यांनी उर्मिला यांना दक्षिणेतील 1992 च्या 'अंथम' आणि 'द्रोही' या चित्रपटांसह 1993 च्या 'गायब' या चित्रपटात संधी दिली होती.

रामू यांनी ऑफिसमधील एका खोलीला दिले होते 'उर्मिला मातोंडकर' नाव

राम गोपाल वर्मा उर्मिला यांच्या प्रेमात एवढे आकंठ बुडाले होते की त्यांनी मुंबईतील अंधेरीस्थित त्यांच्या ऑफिसच्या एका रुमला 'उर्मिला मातोंडकर' असे नाव दिले होते. रामूच्या ऑफिसच्या ग्राऊंड फ्लोअरवर 15 खोल्या आहेत. ज्याचा वापर एडिटिंग, पोस्ट प्रॉडक्शन, साऊंड डिपार्टमेंटसाठी होतो.

राम गोपाल यांच्यासह 13 चित्रपटांमध्ये काम केले
उर्मिला यांनी राम गोपाल वर्मा यांच्यासह एकूण 13 चित्रपटांत काम केले. यात अंथम, द्रोही, गायम, अंगनगा ओका राजू (सर्व तेलुगु चित्रपट), रंगीला, दौड, सत्या, कौन, मस्त, जंगल, कंपनी, भूत आणि आग या चित्रपटांचा समावेश आहे.

ऑफ बीट चित्रपटांमध्येही झळकली
राम गोपाल वर्मा यांची साथ सोडल्यानंतर उर्मिला यांनी काही ऑफबीट चित्रपटांमध्ये काम करण्याचा प्रयत्नही केला. यामध्ये 'पिंजर' आणि 'मैंने गांधी को नहीं मारा' या चित्रपटांचा समावेश आहे. परंतु उर्मिला यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. हे चित्रपट फ्लॉप ठरले होते.

1999 मध्ये 6 चित्रपट एकत्र प्रदर्शित झाले
रंगीला हिट ठरल्यानंतर उर्मिला यांच्या झोळीत अनेक चित्रपट आले. 1999 मध्ये अभिनेत्रीचे 6 चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाले, ज्यात जानम समझा करो, हम तुमपे मरते हैं, दिल्लगी, मस्त, कौन आणि खुबसूरत यांचा समावेश आहे.

रामगोपाल यांच्या पत्नीने उर्मिलाला मारली होती थापड
रामू उर्मिला यांच्या प्रेमात वेडे झाले होते. लवकरच या बातमीचा रामूच्या वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ लागला. एके दिवशी त्यांची पत्नी अचानक सेटवर पोहोचली. दोघांना एकत्र बघून ती इतकी चिडली की तिने उर्मिला यांना थापड मारली होती.

9 वर्षांनी लहान काश्मिरी व्यावसायिकासोबत केले लग्न
3 मार्च 2016 रोजी उर्मिला मातोंडकर यांनी त्यांच्यापेक्षा 9 वर्षांनी लहान असलेल्या काश्मिरी व्यावसायिक मोहसीन अख्तर मीरशी लग्न केले. उर्मिला बर्‍याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहेत. 2018 मध्ये आलेल्या 'ब्लॅकमेल' चित्रपटामधील 'बेवफा ब्यूटी' या आयटम साँगमध्ये त्या दिसल्या होत्या.

राजकारणात ठरली अयशस्वी
2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांना भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात उमेदवारी मिळाली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात त्यांची भाषणे, मुलाखती यातून त्यांची राजकीय समज व सामाजिक प्रश्नांविषयी असलेल्या त्यांच्या आकलनाची चुणूक दिसली होती. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

उर्मिला करोडोंची मालकीण आहे
लोकसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारी अर्ज भरताना उर्मिला यांनी त्यांच्याकडे 68 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर त्यांच्यावर 18 लाखांचे कर्ज आहे. अभिनेत्रीकडे 1 कोटी 27 लाख 95 हजार रुपयांचे हिऱ्यांचे दागिने, 1 लाख 48 हजार रुपयांचे सोन्याचे नाणे आणि 17 लाख 65 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत. त्यांच्याकडे मर्सिडीजसह दोन गाड्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...