आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Happy Bithday Johny: Due To Poverty, Johnny Lever Used To Sell Pens In The Streets After Leaving His Studies In The 7th Standard, Sanjay Dutt Saw Him And He Got A Break In Bollywood.

64 वर्षांचे झाले जॉनी लिव्हर:गरीबीमुळे सातव्या वर्गात शिक्षण सोडून रस्त्यावर पेन विकायचे जॉनी लिव्हर, सुनील दत्त यांची नजर पडल्यावर मिळाला होता बॉलिवूडमध्ये ब्रेक

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तिरंग्याचा अपमान केल्यामुळ झाला होता तुरुंगवास

बॉलिवूडचे पहिले स्टँडअप कॉमेडियन म्हणून ओळखले जाणारे जॉनी लिव्हर यांनी आज वयाची 64 वर्षे पूर्ण केली आहेत. 350 हून अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणा-या या अभिनेत्याला आजवर तब्बल 13 वेळा फिल्मफेअर अवॉर्डमध्ये नामांकन मिळाले आहे. जॉनी असे व्यक्तिमत्व आहेत त्यांची रुपेरी पडद्यावरील उपस्थितीसुध्दा प्रेक्षकांना मनोरंजनात्मक वाटते. लोकांच्या चेह-यावर हसू उमटवणारा हाच विनोदवीर एकेकाळी पोट भरण्यासाठी रस्त्यावर पेन विकत होता. आज जॉनी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात त्यांचा प्रेरणादायी प्रवास...

जॉनी लिव्हर उर्फ ​​जॉनी प्रकाश यांचा जन्म 14 ऑगस्ट 1957 रोजी प्रकाशम, आंध्र प्रदेशातील एका ख्रिश्चन-तामिळ कुटुंबात झाला. जॉनी यांना दोन भाऊ आणि तीन बहिणी, भावंडामध्ये ते सर्वात मोठे आहेत. अभिनेत्याचे बालपण गरीबीत गेले, आर्थिक अडचणीमुळे जॉनी सातवीपर्यंतच शिकू शकले. यानंतर, जॉनी यांनी कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी रस्त्यावर पेन विकायला सुरुवात केली. पेन विकताना, जॉनी मोठ्या चित्रपट कलाकारांच्या नकला करत असे, ज्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित व्हायचे. या कामासाठी त्यांना दररोज पाच रुपये मिळत असत, जे त्या काळानुसार खूप जास्त होते.

जॉनी प्रकाशहून कसे बनले जॉनी लिव्हर
जॉनी यांचे वडील प्रकाश राव जनमुला मुंबईतील हिंदुस्तान लिव्हर फॅक्टरीमध्ये कामगार होते. त्यांच्या सांगण्यावरून जॉनी यांना तिथे नोकरीही मिळाली. येथे त्यांना 100 किलोचे जड ड्रम उचलावे लागत असे. इथेही ते अभिनय आणि कॉमेडीने लोकांना हसवायचे. इथल्याच लोकांनी त्यांना जॉनी लिव्हर हे नाव दिले.

जॉनी मिमिक्री करण्यात इतके पटाईत झाले की त्यांना स्टेज शोसाठी बोलावण्यात यायचे. घराच्या आसपासच्या पार्ट्यांमध्येही जॉनी मिमिक्री करून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असे, त्यासाठी त्यांना पैसे मिळत असत.

सुनील दत्त यांनी बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला
अशाच एका स्टेज शो दरम्यान, बॉलिवूड अभिनेते सुनी दत्त यांची नजर त्यांच्यावर पडली. आणि जॉनी यांना 1989 मध्ये दर्द का रिश्ता मध्ये जोसेफची भूमिका मिळाली. या चित्रपटानंतर त्यांना अनेक मोठ्या ऑफर्स येऊ लागल्या. त्यानंतर त्यांनी मुजरिम, काला बाजार, चालबाज, तेजाब, खिलाड़ी, आंसू बने अंगारे, कोयला, बाजीगर, अंजाम, करण अर्जुन, राजा हिंदुस्तानी, यस बॉस, अंटी नं 1, मिस्टर एंड मिसेज खिलाड़ी, दुल्हे, राजा, कुछ कुछ होता है, कोई मिल गया, हम आपके दिल में रहते हैं, अनाडी, बादशाह अशा शेकडो चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

2000 मध्ये रिलीज झाले होते जॉनी यांचे 25 चित्रपट
2000 मध्ये जॉनी यांचे एक दोन नव्हे तर तब्बल 25 चित्रपट प्रदर्शित झाले होते. यामध्ये दुल्हन हम ले जाएंगे, हम तुमपे मरते हैं, हद कर दी आपने, कुंवारा, जानवर, मेला, बादल, हमारा दिल आपके पास है, फिजा, राजू चारा आणि जोरू का गुलाम या गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे.

तिरंग्याचा अपमान केल्याबद्दल तुरुंगवास
जॉनी लिव्हर यांना 1998 मध्ये 7 दिवस तुरुंगात राहावे लागले होते. त्याच्यावर तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप होता, नंतर त्यांची निर्दोष सुटका झाली. 1986 पासून आजपर्यंत, असे एकही वर्ष नाही जेव्हा जॉनी लिव्हर यांचा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. अलीकडेच ते सारा अली खान आणि वरुण धवनसोबत कुली नं वनमध्ये दिसले होते.

बातम्या आणखी आहेत...