आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणीतरी येणार येणार गं!:दुस-यांदा आईबाबा होणार आहेत गीता बसरा आणि हरभजन सिंग, सोशल मीडियावर खास फोटो शेअर करत दिली गोड बातमी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गीता आणि हरभजन यांनी 29 ऑक्टोबर 2015 रोजी लग्न केले.

बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा आणि क्रिकेटपटू हरभजन सिंग दुसर्‍यांदा आईबाबा होणार आहेत. जुलै महिन्यात गीता आपल्या दुस-या बाळाला जन्म देणार आहे. गीता बसरा हिने सोशल मीडियावर खास फोटो शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या फोटो गीतासह हरभजन आणि त्यांची मुलगी हिनाया दिसत आहे. हिनायाने आपल्या हातात “Soon to be big sister” असा मजकूर लिहिलेले टी-शर्ट पकडले आहे. तर “Coming soon….July 2021” असे कॅप्शन गीताने या छायाचित्रांना दिले आहे.

लग्नाआधी 7 वर्षे होते रिलेशनशिपमध्ये
गीता आणि हरभजन यांनी 29 ऑक्टोबर 2015 रोजी लग्न केले. तर 2016 मध्ये त्यांची मुलगी हिनायाचा जन्म झाला. हरभजन आणि गीता लग्नापूर्वी सात वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण दोघांनी कधीही त्यांच्या नात्याची कबुली सार्वजनिकरित्या दिली नव्हती. पण हरभजनचे क्रिकेटर्स मित्र तिला लग्नापूर्वीच भाभी म्हणून संबोधू लागले होते. लग्नापूर्वीपासूनच गीता हरभजनसाठी करवाचौथचे व्रत ठेवत आली आहे. लग्नाच्या आधी सहा वर्षांपासून गीता हे व्रत ठेवत आली.

गीताने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात इमरान हाश्मीसोबत 2006 सालच्या ‘दिल दिया है’ या चित्रपटातून केली. त्यानंतर तिने 'द ट्रेन', 'जिल्हा गाजियाबाद' आणि 'सेकंड हँड हसबँड' या चित्रपटात काम केले.

बातम्या आणखी आहेत...