आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेहनत करणारा सुपरस्टार:वयाच्या 55 व्या वर्षी  14 वर्षांच्या मुलासारखा काम करतो सलमान खान, कारण सांगताना म्हणाला - माझ्या तरुण पिढीत टायगर श्रॉफसारखे कलाकार आहेत

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मला माझी भाषा आणि वरिष्ठांबद्दल आदर आहे : सलमान

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीचा एक भाग आहे. जगभरात त्याची प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. एका मुलाखतीत तो म्हणाले की, मी वयाच्या 55 व्या वर्षी 14 वर्षाच्या मुलाप्रमाणे काम करत आहे. यामागचे कारण सांगताना तो म्हणाला, माझ्या तरुण पिढीत टायगर श्रॉफ, वरुण धवन, रणवीर सिंग आणि आयुष शर्मासारखे कलाकार आहेत.

मला माझी भाषा आणि वरिष्ठांबद्दल आदर आहे : सलमान

सलमानने सांगितले, "माझ्या पालकांसह सीनिअर्स, ज्युनिअर्स, आणि लहान मुले माझ्याकडे पाहतात. म्हणूनच मला माझी भाषा आणि सीनिअर्सबद्दल आदर वाटतो. ही एक जबाबदारी आहे आणि त्याबद्दल मी जागरुक आहे.,' असे तो म्हणाला.

वयाच्या 55 व्या वर्षी 14 वर्षाच्या मुलाप्रमाणे काम करत आहे

सलमान पुढे म्हणाला, "कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालेल? कोणता चित्रपट फ्लॉप होईल? मला ते जाणून घ्यायला आवडेल, कारण लोक याकडे 9 -5 ची नोकरी म्हणून बघतात. पण मी त्याकडे 24x7 नोकरी म्हणून बघतो. मी फक्त काम करतो. मला काम करायचे आहे. जर एखादा चित्रपटही फ्लॉप झाला तर मी अधिक मेहनत घेतो. हे मला जाणवलं की, जेव्हा तू अपार कष्ट घेता, तेव्हा प्रेक्षकांना तुमची मेहनत समजते आणि त्याचेही कौतुक होते. आता 55-56 व्या वर्षी 14-15 वर्षांच्या मुलाप्रमाणे काम करत आहे. कारण माझ्या तरुण पिढीत टायगर श्रॉफ, वरुण धवन, रणवीर सिंग आणि आता आयुष शर्मा येत आहेत त्यामुळे मला टिकून राहण्यासाठी अजून कष्ट घ्यावे लागतील," असे सलमान म्हणाला.

बातम्या आणखी आहेत...