आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हरियाणातील प्रसिद्ध गायिका सपना चौधरीच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. शनिवारी रात्री तिने रोहतकच्या एका खासगी रुग्णालयात मुलाला जन्म दिला. तिचे पती वीर साहू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी माहिती दिली आहे.
सपनाच्या पतीने फेसबुक लाइव्ह दरम्यान बाळाच्या आगमनाची बातमी दिली. सोबतच प्रेग्नन्सीवरुन सपनाला ट्रोल करणा-या टीकाकारांना उत्तरदेखील दिले. ते म्हणाले, 'एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात लोकांचा हस्तक्षेप अजिबात चांगला नाही. आम्ही आमच्या इच्छेनुसार लग्न केले आहे आणि लोकांना यामुळे काही फरक पडायला नको.' जवळपास चार वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या दोघांनी यावर्षी जानेवारीत लग्न केले होते.
कुटुंबीयांच्या परवानगीने झाले होते दोघांचे लग्न
आपल्या लग्नाविषयी वीर साहू म्हणाले की, 'आम्ही दोन्ही कुटुंबांच्या संमतीने लग्न केले आहे. सपनाच्या संघर्षाचा मी आदर करतो आणि तिच्या कामात हस्तक्षेप करत नाही. आपले अपूर्ण राहिलेले प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी ती लवकरच कमबॅक करेल', असेही ते म्हणाले. सोबतच सोशल मीडियावर ट्रोल करणा-यांना महिला आणि कलाकारांचा आदर करण्याचा सल्लादेखील वीर साहू यांनी दिला.
बिग बॉस 11 मुळे घराघरात पोहोचली सपना
सपना चौधरीची आई नीलम यांनीही एका मीडिया हाऊसशी बोलताना सपना आणि बाळाची तब्येत उत्तम असल्याचे सांगितले. बिग बॉस 11 मध्ये भाग घेतल्यानंतर सपना चौधरी देशभरात खूप प्रसिद्ध झाली होती. लॉकडाऊन दरम्यानही ती तिच्या चाहत्यांचे इंस्टाग्राम व्हिडिओच्या माध्यमातून मनोरंजन करत होती. तर सपनाचे पती वीर साहू हेदेखील हरियाणातील प्रसिद्ध अभिनेते असून त्यांनी अनेक चित्रपट आणि व्हिडिओजमध्ये काम केले आहे.
सपनाचे अनेक व्हिडिओ गाजले
सपनाच्या बर्याच डान्स व्हिडिओंनी इंटरनेट धूम केली आहे. 'तेरी अंखियां का यो काजल', 'सॉलिड बॉडी', 'छोरी भैंस बडी बिंदास' ही तिची सर्वात लोकप्रिय गाणी आहेत. याशिवाय 'वीरे की वेडिंग' चित्रपटातील 'हट जा ताऊ' या डान्स नंबरद्वारे तिने बॉलिवूडमध्येही डेब्यू केला होता. यानंतर, ती अभय देओल स्टारर फिल्म 'नानू की जानू' मधील 'लव बाइट' आणि 'तेरे ठुमके सपना चौधरी' या गाण्यांमध्येही झळकली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.