आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एंगेज झाला हरमन:40 वर्षीय हरमन बावेजाने न्युट्रीशन कोच साशा रामचंदानीसोबत केला साखरपुडा, अभिनेत्री सागरिका घाटगे दिल्या शुभेच्छा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 40 वर्षीय हरमन हा चित्रपट निर्माता हॅरी बावेजांचा मुलगा आहे.

'लव्ह स्टोरी 2050' आणि 'व्हॉट्स योर राशी' यासारख्या चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता हरमन बावेजाने न्यूट्रिशन हेल्थ कोच साशा रामचंदानीसोबत साखरपुडा केला आहे. साशाची मैत्रीण आणि क्रिकेटपटू झहीर खानची पत्नी अभिनेत्री सागरिका घाटगे हिने रविवारी सोशल मीडियावर ही माहिती दिली. तिने सोशल मीडिया स्टोरीमध्ये हरमन आणि साशाचा फोटो शेअर करुन 'साशा आणि हरमन तुम्हाला खूप खूप शुभेच्छा' असे कॅप्शन दिले आहे.

हॅरी बावेजांचा मुलगा आहे हरमन

40 वर्षीय हरमन हा चित्रपट निर्माता हॅरी बावेजांचा मुलगा आहे. त्याने 2008 मध्ये 'लव्ह स्टोरी 2050' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता, ज्यामध्ये प्रियंका चोप्रा त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत झळकली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. यानंतर त्याचा 'विक्ट्री', 'व्हॉट्स योर राशी' आणि 'ढिशक्यांऊं' हे चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नाहीत. यावर्षी, त्याचा आणि जेनेलिया देशमुख स्टारर 'इट्स माय लाइफ' टीव्हीवर रिलीज झाला होता, ज्याचे शूटिंग जवळपास दशकभरापूर्वी झाले होते.

वजन वाढल्यामुळे चर्चेत राहिला

हृतिक रोशनच्या लूक अ लाइक म्हणून ओळखल्या जाणार्‍या हरमन बावेजाने 'ढिशक्यांऊं' नंतर कोणत्याही चित्रपटात काम केले नाही. वजन वाढल्यामुळे तो चर्चेत राहिला होता. लठ्ठ झालेल्या हरमनला लोक ओळखू शकले नव्हते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser