आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरदासपूरच्या एका छोट्याशा गावातून मिस युनिव्हर्सपर्यंतचा प्रवास:1400 लोकसंख्या असलेल्या गावात जन्मलेल्या हरनाजला व्हायचे आहे न्यायाधीश; आई स्त्रीरोग तज्ज्ञ, शेतीशी संबंधित आहे कुटुंब

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वडील परमजीत म्हणाले - मुलीने अभिमानाने मान उंच केली आहे

मिस युनिव्हर्स 2021 हरनाज कौर संधू हे नाव आता जगभरात प्रसिद्धीझोतात आले आहे. पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील कोहाली या छोट्याशा गावात जन्मलेल्या हरनाज कौरचा वयाच्या 21 व्या वर्षी मिस युनिव्हर्सचा मुकुट पटकावण्याचा प्रवास खूप खास आणि प्रेरणादायी आहे.

हरनाज कौरचा जन्म गुरुदासपूर जिल्ह्यातील कोहाली गावात झाला, ज्याची लोकसंख्या फक्त 1393 आहे. एवढ्या छोट्याशा गावातून बाहेर पडून संपूर्ण जगभरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे ही एक खास अनुभूती आहे. हरनाज हिचे कुटुंब शेतीशी निगडित आहे. आता तिचे कुटुंब चंदीगडजवळील मोहालीतील खरारमधील मून पॅराडाईज सोसायटीत वास्तव्याला आहे. तिच्या वडिलांचे नाव परमजीत संधू आणि आईचे नाव रविंदर कौर संधू आहे. भावाचे नाव हरनूर आहे. तिची आई चंदीगड येथील सेक्टर-16 येथील सरकारी रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ आहे.

हरनाजने 2017 मध्ये कॉलेजमध्ये एका शोमध्ये पहिला स्टेज परफॉर्मन्स दिला होता. त्यानंतरच मिस युनिव्हर्सपर्यंतचा तिचा प्रवास सुरू झाला.
हरनाजने 2017 मध्ये कॉलेजमध्ये एका शोमध्ये पहिला स्टेज परफॉर्मन्स दिला होता. त्यानंतरच मिस युनिव्हर्सपर्यंतचा तिचा प्रवास सुरू झाला.

वडील परमजीत म्हणाले - मुलीने अभिमानाने मान उंच केली आहे
हरनाज कौर संधूचे आई-वडील मोहाली जिल्ह्यातील खरार येथील मून पॅराडाईज सोसायटीत राहतात. तिचे वडील परमजीत सांगतात, आम्हाला पूर्ण विश्वास होता की ती जे काही करेल ते योग्यच करेल. आम्ही तिला आमचा पूर्ण पाठिंबा दिला. आमची दोन्ही मुलं हुशार आहेत. काल हरनाजशी बोलणे झाले आणि मी तिला सांगितले की तू तुझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित कर. वाहेगुरुजी सर्व काही ठीक करतील. ती सुद्धा वाहेगुरुचे नामस्मरण करत राहिली. हरनाजने आज सकाळी सांगितले तेव्हा आमच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. आम्ही तिची स्पर्धा पाहू शकलो नाही, परंतु आम्हाला आमच्या मुलीचा अभिमान आहे.

हरनाजचा असा विश्वास आहे की, प्रत्येकाने जे आवडेल ते खायला हवे, परंतु व्यायाम सोडू नये. तिला जे काही आवडतं ते ती सर्व खाते.
हरनाजचा असा विश्वास आहे की, प्रत्येकाने जे आवडेल ते खायला हवे, परंतु व्यायाम सोडू नये. तिला जे काही आवडतं ते ती सर्व खाते.

आईने सांगितले, ती खूप शांत आहे
आई रविंदर कौर संधू यांनी सांगितले की, हरनाज जेव्हाही काही खाते तेव्हा ती थँक्स नक्की म्हणते. हरनाजला मक्की की रोटी आणि सरसों का साग आवडतं. ती आल्यानंतर तिला मी सर्वप्रथम तेच खायला देईन. हरनाजचा भाऊ हरनूरने सांगितले की, आम्हा दोघा बहीणभावंडांमध्ये फार कमी भांडण व्हायचे. त्याला आपल्या बहिणीचा अभिमान आहे. सकाळी फोन करताच हरनाजने त्याला सर्वप्रथम तिचा डॉगी रोजर कसा आहे हे विचारले.

शाळेपासून कॉलेजपर्यंत कधीच ट्युशन लावले नाहीत
हरनाजच्या आईने सांगितल्यानुसार, त्यांच्या मुलीला न्यायाधीश बनायचे आहे. हरनाज हिचे चंदीगडच्या सेक्टर 41 स्थित शिवालिक पब्लिक स्कूलमध्ये शालेय शिक्षण झाले. सेक्टर-35 खालसा स्कूलमधून तिने 12 वीचे शिक्षण पूर्ण केले आहे. हरनाज ही सेक्टर-42 स्थित पोस्ट ग्रॅज्युएट गव्हर्नमेंट गर्ल्स कॉलेज (GCG) ची विद्यार्थिनी आहे. रंगभूमीची आवड असलेल्या हरनाज कौर हिलाप्राण्यांबद्दल विशेष प्रेम आहे. शांत स्वभावाच्या हरनाजने शाळेपासून कॉलेजपर्यंत कधीही कोचिंग घेतले नाही.

हरनाजला भारतीय कपडे घालणे, घोडेस्वारी करणे, पोहणे, अभिनय करणे, नृत्य करणे आणि प्रवास करणे खूप आवडते. मोकळ्या वेळेत ती आपले हे छंद जोपासत असते.
हरनाजला भारतीय कपडे घालणे, घोडेस्वारी करणे, पोहणे, अभिनय करणे, नृत्य करणे आणि प्रवास करणे खूप आवडते. मोकळ्या वेळेत ती आपले हे छंद जोपासत असते.

मिस इंडिया 2019 च्या अंतिम फेरीत पोहोचली
हरनाज कौर संधू मिस इंडिया 2019 च्या अंतिम फेरीत पोहोचली आणि आता मिस युनिव्हर्सचा 70 वा मुकुट जिंकला. ती मिस युनिव्हर्स-2021 बनली आहे. 21 वर्षीय हरलीन कौरने 21 वर्षांनंतर भारताला हा मान मिळवून दिला आहे. यापूर्वी 1994 मध्ये सुष्मिता सेनने आणि लारा दत्ताने 2000 मध्ये हा किताब जिंकला होता. भारताने तिसऱ्यांदा हा मुकुट जिंकला. मिस युनिव्हर्स 2021 चा फिनाले 12 डिसेंबर रोजी इस्रायलमध्ये झाला. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिचाही या स्पर्धेच्या जज पॅनेलमध्ये समावेश होता.

हरनाजने 79 देशांतील सौंदर्यवतींना मागे टाकत मिस युनिव्हर्सचा मान पटकावला आहे. मिस युनिव्हर्सची रनर अप मिस पॅराग्वे नादिया फरेरा आणि दुसरी रनर अप मिस दक्षिण आफ्रिका लालेला मस्वाने ठरली.
हरनाजने 79 देशांतील सौंदर्यवतींना मागे टाकत मिस युनिव्हर्सचा मान पटकावला आहे. मिस युनिव्हर्सची रनर अप मिस पॅराग्वे नादिया फरेरा आणि दुसरी रनर अप मिस दक्षिण आफ्रिका लालेला मस्वाने ठरली.

हरनाजने चित्रपटांमध्ये काम केले आहे
हरनाज कौरने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग क्षेत्रातून केली. अभ्यासासोबतच ती अभिनयही करते. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'यारा दियां पु बारां' आणि 'बाई जी कुट्टांगे' या चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला आहे. तिला न्यायाधीश व्हायचे आहे आणि सध्या तिचा अभ्यास सुरू आहे. तिची इच्छा असल्यास ती चित्रपटातही करिअर करू शकते, असे तिची आई सांगते. बॉलिवूडकडे वळायचे की नाही हा सर्वस्वी तिचा निर्णय असेल, असे तिच्या आईने सांगितले.

हरनाजने अनेक किताब आपल्या नावी केले आहेत
मिस युनिव्हर्स होण्यापूर्वी हरनाजने अनेक किताब आपल्या नावी केले आहेत. हरनाजने 2017 मध्ये टाइम्स फ्रेश फेस मिस चंदीगड, 2018 मध्ये मिस मॅक्स इमर्जिंग स्टार, 2019 मध्ये फेमिना मिस इंडिया पंजाब हे पुरस्कार जिंकले. आणि आता 2021 मध्ये मिस युनिव्हर्स इंडियाचा किताब जिंकून कुटुंबाची आणि देशाची मान उंचावली आहे. अलीकडेच कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात हरनाजला दिवा ऑफ कॉलेज पुरस्काराने गौरविण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...