आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिस युनिव्हर्स अपार्टमेंटमध्ये पोहोचली हरनाज:अतिशय सुंदर आहे  हरनाज संधूचे नवीन घर, मिस यूएसए होणार रूममेट, सध्या आहे क्वारंटाइन

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बघा हरनाजच्या नवीन घरातील आतील नजारा

चंदीगडच्या हरनाज संधूने डिसेंबर 2021 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला. हरनाज 21 वर्षांनंतर सौंदर्य स्पर्धा जिंकणारी तिसरी भारतीय ठरली. मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणाऱ्या स्पर्धकाला न्यूयॉर्कमध्ये एका वर्षासाठी मिस युनिव्हर्स अपार्टमेंट मिळते. हरनाज 4 जानेवारी रोजी तिच्या नवीन घरी पोहोचली, परंतु कोरोना गाइडलाइननुसार ती सध्या क्वारंटाइन आहे. विशेष म्हणजे आलिशान घरात हरनाज एकटी राहणार नाही. मिस यूएसए सोबत ती हे घर शेअर करणार आहे.

हरनाजच्या नवीन घरातील आतील नजारा

हरनाजला सर्व काही मिळेल मोफत
मिस युनिव्हर्स अपार्टमेंटचा मेकओव्हर करण्यात आला आहे. त्यानंतर 2020 ची मिस युनिव्हर्स मेक्सिकोची अँड्रिया मेझा आणि मिस यूएसए अस्या ब्रँच येथे वास्तव्याला होत्या. किराणा सामानापासून कपड्यांपर्यंत, अपार्टमेंटमधील सर्व सुखसुविधा हरनाजसाठी विनामूल्य आहेत. मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशन हे सर्व काही विजेत्यांना देत असते. हरनाजने मिस युनिव्हर्स अपार्टमेंटमध्ये तिच्या एंट्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

माजी मिस युनिव्हर्स अँड्रियाचे पत्र मिळाले
अँड्रियाने हरनाजला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे - "नवीन मिस युनिव्हर्ससाठी, सिस्टरहुड आणि तुझे या नवीन घरात स्वागत आहे. मला अपार्टमेंटमधील माझा पहिला दिवस आठवतो, मी एका क्रेझी आणि सुंदर शहरात नवीन जीवन जगण्यासाठी खूप उत्साहित होती. मला माहित आहे की आपल्या प्रियजनांपासून दूर राहणे कठीण आहे, परंतु लक्षात ठेवा की तुम्ही एकटे नाही आहात. मिस युनिव्हर्स संस्थेमध्ये तुमची एक अद्भुत सपोर्ट सिस्टीम आहे. तुला कधी कुणाशी बोलावेसे वाटले, मित्राची किंवा सल्ल्याची गरज भासली तर मी कायम तुझ्यासाठी तिथे असेल. अँड्रिया."

एक वर्षापूर्वी झाला होता मेकओव्हर
मिस युनिव्हर्स अपार्टमेंटचा मेकओव्हर वर्षभरापूर्वी झाला होता. या अपार्टमेंटच्या खिडकीतून न्यूयॉर्कच्या गगनचुंबी इमारती अतिशय सुंदर दिसतात. इंटेरिअर डिझायनर व्हिव्हियन टोरेस यांनी या घराचे इंटेरिअर डिझाइन केले आहे. ऑफ-व्हाइट भिंती, निळे मखमली सोफे, भिंतीवर कलात्मक पेटिंग आहेत. यामध्ये माजी मिस युनिव्हर्स विजेत्यांच्या छायाचित्रांच्या एका खास भिंतीचा समावेश आहे.

हरनाजने होसेट केले होते आस्क मी सेशन
नवीन घरी आल्यानंतर, हरनाजने आस्क मी एनीथिंग सत्र आयोजित केले. ज्यामध्ये चाहत्यांनी तिला तिच्या आवडत्या गोष्टींबद्दल विचारले. या सेशननुसार राजमा चावल हा तिचा आवडता भारतीय पदार्थ आहे. अगर तुम साथ हो... बे आवडते गाणे आणि स्माईल ट्रेन ही त्याच्या हृदयाच्या जवळचे कॅम्पेन आहे. यासाठी ती यापुढील काळातही कार्यरत राहणार आहे. याशिवाय हरनाजने तिच्या नवीन घराच्या खिडकीतून न्यूयॉर्कमधील स्नो फॉलचा नजाराही दाखवला.

  • 37 कोटींचा क्राउन आणि 1.89 कोटींचे बक्षीस
  • एक वर्षासाठी मेकअप आर्टिस्ट, डेंटिस्ट, स्टायलिस्ट आणि असिस्टंट्स
  • एक वर्षासाठी मेकअप, शूज, कपडे, स्किनकेअर, ज्वेलरी आणि हेअर प्रॉडक्ट्स
  • इंडस्ट्रीतील बेस्ट फोटोग्राफर्सची मॉडेल बनून मॉडेलिंग पोर्टफोलिओ बनवण्याची संधी
  • जगभरातील विशेष इव्हेंट्स, पार्टीज, स्क्रिनिंग्स आणि प्रीमिअरमध्ये सहभागी होण्याची संधी
  • वर्ल्ड टूरदरम्यान खाणे-राहणे मोफत, ज्याचा संपूर्ण खर्च मिस यूनिव्हर्स ऑर्गनाइजेशन उचलणार
  • हरनाज पुढील वर्षभरासाठी मिस यूनिव्हर्स ऑर्गनाइजेशनची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असेल.
  • तिला सर्व पत्रकार परिषदा, चॅरिटी, पार्टी आणि संस्थेच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये सहभागी व्हावे लागेल.