आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरनाजवर शुभेच्छांचा वर्षाव:21 वर्षांनंतर भारताच्या हरनाज संधूने पटकावला 'मिस युनिव्हर्स'चा किताब , लारा दत्ता म्हणाली- अभिनंदन, क्लबमध्ये तुझे स्वागत आहे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक सेलिब्रिटींनी तिचे कौतुक केले आहे.

भारताच्या हरनाज संधूने मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला आहे. तब्बल 21 वर्षांनंतर हरनाजने भारतासाठी विश्वसुंदरीचा किताब पटकावला आहे. याआधी 1994 मध्ये सुश्मिता सेनने आणि 2000 मध्ये लारा दत्ताने विश्वसुंदरी होण्याचा मान मिळवला होता. यंदाचे विश्वसुंदरी स्पर्धेचे हे 70 वे वर्ष आहे. 12 डिसेंबर रोजी इस्रायलमध्ये मिस युनिव्हर्सची स्पर्धा पार पडली. मिस युनिव्हर्सचा किताब मिळवल्यानंतर हरनाजवर भारतासह जगभरातून वर्षाव केला जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी तिचे कौतुक केले आहे.

अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स लारा दत्ताने पोस्ट शेअर करत तिचे कौतुक केले आहे. लाराने लिहिले, "अभिनंदन हरनाज संधू, कल्बमध्ये तुझे स्वागत आहे!!! यासाठी आम्ही तब्बल 21 वर्षे वाट पाहिली !!! तुझा आम्हाला खूप खूप अभिमान वाटतो !!! अब्जावधी स्वप्ने तू सत्यात उतरवली. @MissDivaOrg @MissUniverse।

प्रियांका चोप्राने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या स्पर्धेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'अभिनंदन हरनाज संधू. तब्बल 21 वर्षानंतर मिस युनिव्हर्सचा मुकूट परत घरी आणल्याबद्दल तुझे अभिनंदन,' असे प्रियांका म्हणाली.

हरनाजने 79 देशांतील सौंदर्यवतींना मागे टाकत मिस युनिव्हर्सचा मुकुट आपल्या नावी केला. मिस युनिव्हर्सची रनर अप मिस पॅराग्वे नादिया फरेरा आणि दुसरी रनर अप मिस दक्षिण आफ्रिका लालेला मस्वाने ठरली. अभिनेत्री उर्वशी रौतेलाला मिस युनिव्हर्स स्पर्धेचे परीक्षण करण्याची संधी मिळाली. ती भारतासाठी ज्युरी टीमचा भाग होती.

बातम्या आणखी आहेत...