आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊनमध्ये वाद:राहत फतेह अली खानसोबत भारतीय गायकांचे ऑनलाईन कॉन्सर्ट, एफडब्ल्यूआयसीने दिली अंतिम चेतावणी 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हर्षदीप कौर आणि काही अन्य भारतीय गायकांच्या ग्रुपने शनिवारी एक ऑनलाईन कॉन्सर्ट केला होता, ज्यात पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानदेखील सहभागी झाले होते.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात अजूनही तणाव कायम आहे आणि पाकिस्तानी कलाकारांवर भारतात किंवा भारतीय कलाकारांसोबत परफॉर्म करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान, भारतीय गायिका हर्षदीप कौर आणि डिझायनर विजय अरोरासोबत एका ऑनलाईन कॉन्सर्टमध्ये सहभागी झाले होते. या संदर्भात, फेडरेशन आणि वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने (एफडब्ल्यूआयसीई) भारतीय गायकांना नोटिस बजावली असून भविष्यात पुन्हा अशा प्रकारची कृती केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

एका संभाषणात एफडब्ल्यूआयसीईचे सरचिटणीस अशोक दुबे म्हणाले, काल (शनिवारी) विजय अरोरा आणि हर्षदीप कौर यांनी पाक गायक राहत फतेह अली खान यांचा सहभाग असलेल्या एका ग्रुपसोबत ऑनलाईन सिंगिंग प्रोग्राम केला होता. आम्ही फार पूर्वी एक परिपत्रक जारी केले होते ज्यात, भारतीय कलाकार कोणत्याही प्रकारे पाकिस्तानी कलाकारांना सहयोग करणार नाहीत असे नमुद केले होते. तरीही हे घडत आहे."

  • 'लॉकडाऊन अंतर्गत हे चुकीचे'

दुबे पुढे म्हणाले, "जर हे लोक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हे करत असतील तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. जरी त्यांनी हे व्यावसायिक पातळीवर प्रमोट केले नसले तरीदेखील त्यांना हे समजण्याची गरज आहे की आजही पाकिस्तानी लष्कर भारतीय सैनिकांवर हल्ला करत आहेत. तसेच, हे विसरू नये की गेल्या वर्षी पुलवामा हल्ल्यानंतर कोणत्याही भारतीय कलाकार वा संगीतकाराने पाक कलाकाराबरोबर काम करू नये हे स्पष्ट केले होते. पण हे लोक अजूनही असे करत आहेत."

  • 'हा अंतिम इशारा आहे'

भविष्यात पुन्हा असे घडल्यास काय केले जाईल? असा प्रश्न दुबे यांना विचारला असता ते म्हणाले, "आम्ही त्यांच्यावर (भारतीय कलाकारांवर) बंदी घालू आणि आमच्या चित्रपटसृष्टीत अशा लोकांना कुणीही काम देऊ नये याची काळजी घेतली जाईल. हा अंतिम इशारा आहे. यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही."

बातम्या आणखी आहेत...