आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीचा हात:गरजूंसाठी ऑक्सिजन कंसन्ट्रेटर खरेदी करणार हर्षवर्धन राणे, विकणार स्वतःची रॉयल एनफील्ड

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हर्षवर्धनला मागील वर्षी कोरोनाची लागण झाली होती.

देशात कोरोनाच्या दुस-या लाटेने हाहाकार माजवला आहे. याकाळात अनेक कलाकार कोरोना रुग्णांना आपल्या परीने जमेल ती मदत करत आहेत. आता यात अभिनेता हर्षवर्धन राणेच्या नावाचाही समावेश झाला आहे. हर्षवर्धनने सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून स्वतःची बाईक विकणार असल्याचे सांगितले आहे. या पैशातून तो गरजूंसाठी ऑक्सिजन कंसन्ट्रेटर खरेदी करणार आहे. हर्षवर्धनने ही बाईक 2014 मध्ये खरेदी केली होती.

मागील वर्षी हर्षवर्धनला झाला होता कोरोना संसर्ग
हर्षवर्धनने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्याच्या बाईकचे फोटो त्याने शेअर केले आहेत. हर्षवर्धनची ही आवडती बाईक असल्याचे म्हटले जाते. 'कृपया कोणी तरी माझी ही बाईक विकत घ्या… त्यातून मिळणाऱ्या पैशांतून मी ऑक्सिजन कंसन्ट्रेटर विकत घेईल आणि ज्यांना गरज आहे त्यांना मदत करेन. हैदराबादमध्ये मला चांगल्या गुणवत्तेचे ऑक्सिजन कंसन्ट्रेटर शोधण्यास मदत करा….”, अशा आशयाचे कॅप्शन हर्षवर्धनने ते फोटो शेअर करत दिले आहे.

ऑक्टोबर 2020 मध्ये हर्षवर्धनला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे त्याला आयसीयूत दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तो चार दिवस ऑक्सिजन सपोर्टवर होता. हर्षवर्धन ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आला आहे. लवकरच तो जॉन अब्राहम स्टारर ‘तारा बनाम बिलाल’ या चित्रपटातही दिसणार आहे.

अनेक कलाकार मदतीसाठी आले पुढे
हर्षवर्धन राणेपूर्वी बॉलिवूडमधील अनेक कलाकार गरजूंच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. कन्नड अभिनेता अर्जुन गौडा सध्या रुग्णवाहिका चालक म्हणून काम करतोय. तो रुग्णांना हॉस्पिटपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. याशिवाय कोरोना मृत झालेल्या लोकांवर तो अंत्य संस्कारदेखील करतोय. याशिवाय सोनू सूद, अक्षय कुमार ट्विंकल खन्ना, भूमी पेडणेकर, गुरमीत चौधरी हे कलाकारदेखील लोकांच्या मदतीसाठी काम करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...