आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुड न्यूज:सोनाक्षी सिन्हाचा झाला साखरपुडा? मिस्ट्री मॅनच्या खांद्यावर हात ठेवून एंगेजमेंट रिंग केली फ्लॉंट

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. हे फोटो पाहून त्यांची एंगेजमेंट झाल्याचं दिसतंय. फोटोंमध्ये ती एका मिस्ट्री मॅनसोबत दिसत आहे, परंतु कोणत्याही फोटोमध्ये तिने या मिस्ट्री मॅनचा चेहरा उघड केलेला नाही. आता हा मिस्ट्री मॅन कोण यावर सस्पेन्स कायम आहे. पण प्रत्येक फोटोमध्ये सोनाक्षी तिची अंगठी नक्कीच फ्लॉंट करताना दिसत आहे.

सोनाक्षीने शेअर केले तीन फोटो
सोनाक्षीने सोशल मीडियावर तीन वेगवेगळे फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये सोनाक्षी तिची एंगेजमेंट रिंग फ्लॉंट करताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये ती मिस्ट्री मॅनच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवून पोज देताना दिसत आहे. त्याचवेळी तिसर्‍या फोटोत ती हसत हसत तिच्या जोडीदाराचा हात पकडत आहे.

तिचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे सोनाक्षीने सांगितले
हे फोटो शेअर करत सोनाक्षीने लिहिले, 'माझ्यासाठी हा खूप मोठा दिवस आहे!!! माझ्या सर्वात मोठ्या स्वप्नांपैकी एक पूर्ण होत आहे…आणि ते तुमच्या सर्वांसोबत शेअर करण्यासाठी मी थांबू शकत नाही. विश्वास बसत नाही की ते इतके सोपे होते.' हे फोटो पाहून चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण शुभेच्छा देत आहेत. हुमा कुरेशीने तिच्या सोशल मीडिया स्टोरीवर सोनाक्षीचा फोटो शेअर करून आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर सोनाक्षीसोबतचा हा मिस्ट्री मॅन कोण आहे हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

'दबंग' चित्रपटातून करिअरची सुरुवात
सोनाक्षीने 2010 मध्ये सलमानच्या दबंग या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ती 'राउडी राठौर', 'दबंग 2', 'लुटेरा', 'बुलेट राजा', 'हॉलिडे', 'तेवर', 'अकिरा', 'कलंक', 'खानदानी शफाखाना', 'दबंग 3, मिशन मंगल सारख्या चित्रपटात ती दिसली आहे. सोनाक्षी अलीकडेच अजय देवगण, शरद केळकर, नोरा फतेही यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटात दिसली होती. 'काकुडा' आणि 'डबल एक्सएल' हे तिचे आगामी चित्रपट आहेत.

बातम्या आणखी आहेत...