आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

भूमिकेसाठी:'कसक'मध्ये बलात्कार पीडित अरुणा शानबागची भूमिका साकारतेय इहाना,  म्हणाली - ‘या पात्राचा मनावर खूप परिणाम झाला, सतत रडत बसायचे...’

उमेश कुमार उपाध्याय. मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या वेब सिरिजचा प्रीमियर 5 जून रोजी उल्लू अॅप प्रदर्शित होईल.

अभिनेत्री इहाना ढिल्लोने ‘हेट स्टोरी 4’ सह बऱ्याच पंजाबी चित्रपटात अभिनय केला आहे. ती आता ‘कसक’ वेब सिरिज मध्ये दिसणार आहे. या वेब सिरिजचा प्रीमियर 5 जून रोजी उल्लू अॅप प्रदर्शित होईल. अरुणा शानबाग केसशी प्रेरित या सिरिजमध्ये ती मुख्य भूमिका साकारतेय. इहानाने याच्या चित्रीकरणाचे अनुभव शेअर केले आहेत.

इहाना म्हणाली, 'ही अरुणा शानबाग केस शी प्रेरित कथा आहे. जिच्यावर बलात्कार झाला होता. ती एका हॉस्पिटलमध्ये नर्स होती. जिच्यावर एका वॉर्ड बॉयने बलात्कार केला होता. यानंतर ती काेमात गेली होती. ती 42 वर्षे कोमात होती. तिने 42 वर्षे कोमात राहून तिने कसे सहन केले, ही त्याची कथा आहे. मी यात मुख्य भूमिका साकारतेय. हे खूपच भावनिक पात्र आहे. ज्यात आम्ही एका रुग्णालयातच चित्रीकरण केले आहे. याचे कथानक इतके भावनिक आहे की, ज्यावेळी दिग्दर्शक दीपक पांडे पहिल्यांदा कथानक सांगत होते तर माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्यांनी जितक्यावेळा कथा ऐकवली तेव्हा तेव्हा मी रडले. आम्ही ज्यावेळी चित्रीकरण करायचो त्यावेळी भयान शांतता असायची. ही भूमिका साकारताना मला भावना इशाऱ्यांमध्ये व्यक्त कराव्या लागायच्या हे सर्वांत कठीण होते. या पात्राला मी कधीच विसरू शकणार नाही. मी तर त्यांची फक्त भूमिका साकारतेय तर इतका त्रास होतोय त्यांनी ४२ वर्षे कोमात राहून हा त्रास सहन केला तर त्यांना किती यातना झाल्या असतील? बऱ्याचदा त्या पात्रात इतकी समरस व्हायचे की त्यातून बाहेर यायला खूप उशीर लागायचा. बरेचदा घरी बसल्या बसल्या अश्रू यायचे. याचे चित्रीकरण संपल्यानंतर मी एका पंजाबी िवनोदी चित्रपटाचे चित्रीकरण करत होते तर बरेचदा असे व्हायचे की, या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातही मी बसल्याबसल्या रडायचे इतका या पात्राचा परिणाम माझ्यावर झाला होता. त्यावेळी मला स्वत:ला बदलण्यास खूप अडचणी आल्या.'

0