आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला:मकरसंक्रांतीला रिलीज होणार 'हाथी मेरे साथी’, मुख्य भूमिकेत राणा दग्गुबातीसह मराठमोळी श्रिया पिळगावकर

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा चित्रपट हिंदीबरोबरच दोन इतर भाषेतदेखील रिलीज होणार आहे.

राजेश खन्नाचा हिट चित्रपट 'हाथी मेरे साथी’ नंतर आता याच शीर्षकावर एक चित्रपट बनत आहे. यात राणा दग्गुबाती आणि पुलकित सम्राट मुख्य भूमिकेत आहेत. राणाने या चित्रपटाविषयी नुकतीच घोषणा केली. हा चित्रपट हिंदीबरोबरच दोन इतर भाषेतदेखील रिलीज होणार आहे. तामिळमध्ये चित्रपटाचे नाव असेल ‘कादान’ आणि तेलुगूमध्ये याचे नाव असेल ‘अरन्या’.

राणाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर माहिती देताना सांगितले, चित्रपट 2021 मध्ये मकर संक्रांतीच्या वेळी रिलीज होणार आहे. यासोबतच त्याने चित्रपटाचे मोशन पोस्टरदेखील रिलीज केले आहे. 'हाथी मेरे साथी’मध्ये माणसाने प्राण्यांच्या राहण्याच्या जागेवर अतिक्रमण केल्याची कथा आहे. यातून प्राण्यांविषयी प्रेम आणि संरक्षणाचा संदेशदेखील देण्यात येणार आहे. मानवाने जंगलात ही प्रवेश केला आहे. जंगलात झाडी कापली जातात, तेथेही अतिक्रमण केले जाते, यावर चित्रपटातून आवाज उठवला जाणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभु सॉलमोन यांनी केले आहे. राणा आणि पुलिकतसह या चित्रपटात श्रिया पिळगावकर आणि जोया हुसैनदेखील मुख्य भूमिकेत आहेत.