आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिचा चड्ढा अब्रुनुकसानीचे प्रकरण:रिचाची माफी मागायला आणि विधान परत घ्यायला पायल घोष तयार, एका मुलाखतीत अनुराग कश्यपसोबत जोडले होते रिचाचे नाव

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पायल घोषच्या म्हणण्यानुसार, अनुरागने तिला सांगितले की, रिचा चड्ढा, हुमा कुरैशी आणि माही गिल या अभिनेत्री एका शब्दावर त्याच्याकडे येतात.
  • रिचा चड्ढाने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की -कुठल्याही महिलेला दुस-या महिलेवर निराधार व खोटे आरोप करण्याचा अधिकार नाही.

एका मुलाखतीत दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत अभिनेत्री रिचा चड्ढाचे नाव जोडल्याने अभिनेत्री पायल घोष अडचणीत सापडली होती. त्यानंतर रिचा चड्ढाने पायलवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. आता या प्रकरणी पायल घोष माफी मागायला तयार झाली आहे. सोमवारी दुपारी झालेल्या ऑनलाइन सुनावणीदरम्यान तिचे वकील नितीन सातपुते यांनी कोर्टाला सांगितले की, पायल आपले विधान परत घ्यायला आणि माफी मागायला तयार आहे. त्यावर कोर्टाने त्यांना रिचाच्या वकिलांशी बोलून हे प्रकरण सेटल करण्यास सांगितले आणि त्याचा रिपोर्ट सोमवारी कोर्टात सादर करायला लावला. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता सोमवारी होणार आहे.

कोर्टाने दुपारी 3 वाजेपर्यंतची दिली होती मुदत
या प्रकरणावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान कोर्टाने अभिनेत्री पायल घोषचे वकील नितीन सातपुते यांना ती माफी मागणार का?, असे विचारले होते. यावर वकील नितीन सातपुते यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, पायल सहज रिचाबद्दल ती गोष्टी बोलली आणि ती रिचाची फॉलोअर आहे. ते म्हणाले की, पायल उशीरा रात्री मुंबईला परतली असून आपला निर्णय घेण्यासाठी तिला थोडा वेळ देण्यात यावा. यावर कोर्टाने आज दुपारी तीन वाजेपर्यंतची मुदत दिली होती. तिच्या निवेदनाची सीडीही कोर्टात सादर केली गेली.

सुनावणीदरम्यान कोर्टाने कमाल आर. खानचे वकील मनोज गडकरी यांनाही रिचाची माफी मागणार का? असा प्रश्न केला. त्यावर कमाल देशाबाहेर असल्याचे सांगून उत्तर द्यायला थोडा वेळ मागितला. यावर कोर्टाने त्यांनाही सोमवारपर्यंतची मुदत दिली आहे.

रिचाने मागितली होती एक कोटी 10 लाखांची नुकसानभरपाई

अभिनेत्री रिचा चड्ढा हिने पायल घोषवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान कोर्टाने अभिनेत्री पायल घोषचे वकील नितीन सातपुते यांना ती माफी मागणार का?, असे विचारले. यावर वकील नितीन सातपुते यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, पायल सहज रिचाबद्दल ती गोष्टी बोलली आणि ती रिचाची फॉलोअर आहे. ते म्हणाले की, पायल उशीरा रात्री मुंबईला परतली असून आपला निर्णय घेण्यासाठी तिला थोडा वेळ देण्यात यावा. यावर कोर्टाने आज दुपारी तीन वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. तिच्या निवेदनाची सीडीही कोर्टात सादर केली गेली.

निर्माता अनुराग कश्यपविरोधात लैंगिक छळ केल्याचा आरोप करणारी अभिनेत्री पायल घोषच्या विरोधात अभिनेत्री रिचा चढा हिने अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला असून 1 कोटी 10 लाखांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. एका टीव्ही मुलाखतीत पायलने आपल्याला खोट्या प्रकरणात खेचल्याचा आरोप रिचाने केला आहे. यापूर्वी, त्यावर 6 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार होती, पण पायल घोषच्या वतीने कोणीही कोर्टात हजर झाले नाही, त्यानंतर कोर्टाने 7 ऑक्टोबर रोजी सुनावणी ठेवली होती.

पायल घोष व्यतिरिक्त रिचाने चित्रपट समीक्षक कमाल आर खान आणि एका वृत्तवाहिनीला यात प्रतिवादी केले आहे. या प्रकरणावर न्यायमूर्ती अनिल के मेनन यांचे एकल खंडपीठ सुनावणी घेत आहे. रिचाने वरिष्ठ वकील वीरेंद्र तुळजापूरकर यांच्यामार्फत न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. सर्व पक्षांना ईमेलद्वारे उत्तर नोंदविण्यास नोटीस देण्यात आली आहे.

पायलने असे ओढले रिचाचे नाव
पायलने दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात दाखल केलेल्या आपल्या तक्रारीत दावा केला आहे की, अनुरागने तिला सांगितल्यानुसार, रिचा चड्ढा, माही गिल, हुमा कुरैशी हे कलाकार माझ्या एका शब्दावर हवं तेव्हा माझ्याकडे येतात. आणि अनुरागला पायलकडूनही हीच अपेक्षा होती.

पायल म्हणाली - मला रिचा चड्ढाशी काहीही घेणदेणं नाही
पायलने एएनआयला दिलेल्या मुलाखतीत या अब्रू नुकसानीच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली होती. 'मला रिचा चड्ढाशी काही देणघेणं नाही. मी तिच्यावर कुठलेही आरोप केलेले नाहीत. तिची नेमकी काय समस्या आहे मला माहित नाही. मी तेच बोलले जे मला अनुरागने सांगितले होते. आम्ही या प्रकरणावर कायदेशीर उत्तर देऊ,' असे पायल म्हणाली आहे.

रिचाने आपल्या याचिकेत काय म्हटले
रिचाने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, तिसर्‍या व्यक्तीविरूद्ध केलेल्या दाव्यांमध्ये माझे नाव ओढले गेले आहे. यासोबतच रिचाने अब्रुनुकसानीच्या दाव्याबरोबरच पायल आणि इतरांना खोटी वक्तव्ये करण्यापासून रोखण्याचा अंतरिम दिलासा देण्याची मागणीही केली आहे. पायलने आपल्याबाबतीत केलेली वक्तव्ये खोटी आणि बदनामी करणारी असल्याचा आरोप रिचाने याचिकेद्वारे केला आहे.

बातम्या आणखी आहेत...