आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिना खानचा ब्रेकअप झालेला नाही:'षडयंत्र'साठीचा होता पब्लिसिटी स्टंट, म्हणाली - मी खोटेपणा आणि धोक्याच्या जाळ्यात फसले आहे

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री हिना खानने नुकतीच एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत तिचा विश्वासघात झाल्याचे म्हटले होते. त्यावरुन हिनाचा तिचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत ब्रेकअप झाल्याचा अंदाज वर्तवला गेला. पण हा सगळा पब्लिसिटी स्टंट असल्याचे समोर आले आहे. हिनाने नव्या प्रोजेक्टची घोषणा करून सर्वांनाच धक्का दिला आहे. हिनाने बुधवारी तिचा नवीन प्रोजेक्ट 'षडयंत्र'चा टिझर रिलीज केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री खोटेपणा आणि धोक्याच्या जाळ्यात अडकलेली दिसतेय.

बुधवारी हिनाने एक पोस्ट शेअर केली होती. ती पोस्ट वाचून चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यावरून हिनाचे रॉकीसोबतचे 13 वर्षांचे नाते संपुष्टात आल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला होता. मात्र हिनाने आता ब्रेकअपच्या वृत्तांना पूर्णविराम लावला आहे.

काय होती हिनाची पोस्ट
हिनाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिले होते, 'विश्वासघात हे एक असे एकमेव सत्य आहे, जी टिकून राहते, 'betrayal is the only truth that sticks' असे हिनाने म्हटले.

यानंतर तिने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे, त्यात तिने म्हटले, 'ज्या व्यक्तीने तुमच्या विश्वासघात केल्या, त्याच्यावर आंधळेपणानं विश्वास ठेवला, यासाठी स्वत:ला माफ करायलाही विसरू नका. अनेकदा चांगले मन वाईट गोष्टी पाहत नाही.' हिनाच्या या पोस्टनंतर चाहते चिंतेत होते. पण षडयंत्रचा टिझर रिलीज झाल्यावर हा सगळा पब्लिसिटी स्टंट असल्याचे सगळ्यांना कळले आहे.

हिनाचा षडयंत्र हा नवा प्रोजेक्ट झी थिएटरअंतर्गत येत आहे, त्याच्या प्रमोशनसाठी तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. 'षडयंत्र' नावाच्या ड्रामामध्ये ती दिसणार आहे. ही एक मर्डर मिस्ट्री असून त्यामध्ये तिच्यासह कुणाल रॉय कपूर, चंदन रॉय सान्याल दिसणार आहेत. तिने हा टिझर शेअर करताना म्हटले आहे की, 'मी फसले आहे खोटेपणा आणि धोक्याच्या जाळ्यात, हे 'षडयंत्र' कुणी रचले?' अभिनेत्रीचा वेगळाच अंदाज या टिझरमध्ये पाहायला मिळतो आहे.

कोण आहे रॉकी जयस्वाल?
हिना खान 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून घराघरांत पोहोचली. रॉकी जयस्वाल या मालिकेच्या सह-निर्मात्यांपैकी एक होता. शो दरम्यान सेटवर दोघांचे सूत जुळले. या शोच्या 8 वर्षानंतर या कपलने त्यांचे नाते सार्वजनिक केले होते. रॉकीने बिग बॉस 11 मध्ये हिनाला प्रपोज केले होते. त्यानंतर दोघेही अनेक वेळा एकत्र स्पॉट झाले आहेत. अलीकडे, 27 नोव्हेंबरला हिनाने तिच्या तुर्की सहलीचे फोटो शेअर केले, ज्यामध्ये रॉकी देखील तिच्यासोबत दिसतोय..

हिनाचा सध्या लग्नाचा विचार नाही

2020 मध्ये मीडियाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान हिना तिच्या लग्नाबद्दल खुलेपणाने बोलली होती. यादरम्यान हिना म्हणाली होती की, तिचे चित्रपटातील करिअर नुकतेच सुरू झाले आहे, त्यामुळे ती सध्या लग्नाच्या विचारात नाही. मात्र, 2-3 वर्षांनी हिनाने लग्नाचे संकेत दिले.

बातम्या आणखी आहेत...