आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्यानमारहून भारतात पायी आल्या होत्या 3 वर्षांच्या हेलेन:उपासमारीने शरीराचा सांगाडा बनला, आईचा गर्भपात अन् भावाचा मृत्यू झाला

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदी चित्रपटांतील कॅबरे क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेलेन आज 84 वर्षांच्या झाल्या आहेत. सौंदर्य आणि अनोख्या नृत्याच्या स्टाईलने त्यांनी लाखो चाहत्यांच्या मनावर गारूड घातले होते. पिया तू अब तो आजा, आओ ना गले लग जाओ ना, ये मेरा दिल, आ जाने जा, महबूबा महबूबा सारख्या कित्येक गाण्यांवर नृत्य करणाऱ्या हेलेन यांनी एनर्जी डान्सचे नवे निकष बनवले.

एक काळ असाही आला होता जेव्हा त्यांची एक झलक पाहण्यासाठी इतकी गर्दी व्हायची की यापासून वाचण्यासाठी हेलेन यांना बुरखा घालून, लपत-छपत बाहेर पडावे लागायचे. हिंदी सिनेमाच्या इतिहासातील कोणत्याही डान्सरला इतकी लोकप्रियता तेव्हा मिळालेली नव्हती. तर एक काळ असाही होता जेव्हा टाईप कास्ट असूनही त्यांच्यावर व्हाईट स्किन वेस्टर्न व्हॅम्पचा शिक्का बसला होता.

याशिवाय हेलेन यांचे आयुष्य अनेक दुःखद प्रसंगांनी भरलेले राहिले. 3 वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. देशातून काढल्यानंतर त्यांनी म्यानमार ते भारतापर्यंत कित्येक किलोमीटरचा पायी प्रवास केला. या प्रवासात पायी चालताना त्यांच्या आईचा गर्भपातही झाला, भावाचा मृत्यू झाला आणि त्या स्वतः एखाद्या हाडाच्या सापळ्यासारख्या झाल्या होत्या. 13 वर्षांच्या असतानाच जबाबदाऱ्यांमुळे त्यांचे बालपण हिरावले गेले. कधी 27 वर्षांनी मोठ्या व्यक्तीसोबत विवाह तर कधी दुसरी पत्नी बनून अनेक वर्षांपर्यंत त्यांना कौटुंबिक सुखापासून वंचित राहावे लागले.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया चित्रपटांत चमकणारे कपडे घालून, चेहऱ्यावर हसू आणत नाचणाऱ्या हेलेन यांच्या अंधकारमय आयुष्याच्या 5 भावनिक कथा-

पहिली कथा हेलेन यांच्या बालपणाची. हेलेन एन रिचर्डसन यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1938 रोजी ब्रिटिश म्यानमारमधील रंगून येथे झाला. त्यांचे वडील डेसिमियर जॉर्ज हे फ्रेंच तर आई मर्लिन ही म्यानमारची होती. कालांतराने आईने ब्रिटिश वंशाच्या रिचर्डसन यांच्याशी दुसरा विवाह केला. त्यांना रॉजर नावाचा एक भाऊ आणि दत्तक घेतलेली जेनिफर नावाची बहिण होती. सावत्र वडील रिचर्डसन यांच्या दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बवर्षावात मृत्यू झाला. जपानमधील लोकांनी म्यानमारवर ताबा मिळवला. परिस्थिती इतकी बिघडली की हेलेन यांच्या कुटुंबाला देशाबाहेर काढण्यात आले.

1943 मध्ये त्यांची गर्भवती आई, एक छोटा भाऊ, बहीण आणि हेलेन यांना घेऊन पायीच म्यानमारहून भारताच्या दिशेने निघाली. हा प्रवास तब्बल 867 किलोमीटरचा आहे. या सलग पायी प्रवासासाठी 178 तासांचा कालावधी लागू शकतो. सोबत कोणतेही सामान नव्हते, पैसे नव्हते, कपडे आणि जेवण काहीच नव्हते. तहानभूकेने व्याकूळ स्थितीत त्यांनी शेकडो गाव आणि जंगले ओलांडली. भूक आणि आजाराचा प्रभाव दिसत राहिला आणि हळूहळू सोबत चालणाऱ्यांची संख्या कमी होत गेली. हेलेनच्या गर्भवती आईचा रस्त्यातच गर्भपात झाला आणि भावाचीही तब्येत बिघडली.

जे लोक अखेरिस भारतात पोहोचण्यात यशस्वी ठरले त्यांना सुदैवाने ब्रिटिश सैनिकांकडून मदत मिळाली. सैनिकांनी हेलेन, त्यांची आई आणि मुलांना रुग्णालयात दाखल केले. शरीराचा सांगाडा बनला होता आणि अनेक ठिकाणी जखमा झालेल्या होत्या. भावाचाही आजाराने मृत्यू झाला. दोन महिन्यांपर्यंत हेलेन, त्यांची आई आणि बहीण रुग्णालयात राहिल्या. तब्येत सुधारल्यानंतर त्या कोलकात्यात येऊन राहिल्या.

कोलकात्यात काही दिवस घालवल्यानंतर त्यांचे कुटुंब मुंबईत आले. आईने नर्स म्हणून काम सुरू केले. त्यांच्यावर हेलेनसह चौघांच्या पालनपोषणाची जबाबदारी होती. नर्सिंगमधील किरकोळ कमाईतून खाण्या-पिण्याचा आणि शिक्षणाचा खर्च करणे शक्य नव्हते. हेलेन मोठ्या होत्या, तर त्यांनी कमाईची जबाबदारी उचलली आणि 13 वर्षांच्या असताना शिक्षण सोडून दिले. त्यांच्या एक कौटुंबिक मैत्रीण होत्या, कुक्कू. त्या हिंदी सिनेमात डान्सर होत्या. त्यांना पाहून हेलेनच्या आईनेही त्यांना डान्सर बनवण्याचा निर्णय घेतला.

हेलेन यांना नृत्याचे प्रशिक्षण त्यांनी दिले. यात त्यांना कुक्कू यांनी मदत केली. कुक्कूंनीच हेलेन यांना 1951 मध्ये शाबिस्तान आणि आवारा या चित्रपटात कोरस डान्सर म्हणून काम मिळवून दिले. या गर्दीत हेलेन विरून गेल्या. अनेक महिने गर्दीत राहून डान्स केल्यानंतर हेलेन यांना सातत्याने बॅकग्राऊंड डान्सरचे काम मिळायला लागले. चित्रपटागणिक त्यांचा परफॉर्मन्सला व्यासपीठ मिळत गेले आणि अलिफ लैला, हूर-ए-अरबसारख्या चित्रपटांत त्या सोलो डान्सर म्हणूनही दिसल्या.

19 वर्षांच्या हेलेन हावडा ब्रिजमधील मेरा नाम चिन चिन चू या गाण्यात लीड डान्सर म्हणून दिसल्या. हे गाणे त्यांच्या करिअरमधील मोठा ब्रेक ठरले आणि यानंतर त्यांच्याकडे सातत्याने मोठ्या ऑफर्स येऊ लागल्या.

हावड़ा ब्रिज (1958) चित्रपटातील हेलेन यांचे गाणे- मेरा नाम चिन चिन चू.
हावड़ा ब्रिज (1958) चित्रपटातील हेलेन यांचे गाणे- मेरा नाम चिन चिन चू.

तिसऱ्या कथेपूर्वी एक नजर हेलेन यांच्या करिअरवर-

1958 ते 1972 पर्यंत हेलेन सुमारे 500 चित्रपटांमध्ये दिसल्या. तर 1982 पर्यंत त्या 600 गाण्यांमध्ये दिसल्या होत्या. 60, 70 आणि 80 च्या दशकातील त्या एकमेव डान्सर होत्या, ज्यांच्याशिवाय कोणत्याही आयटम साँगचा विचार करणे कठीण होते. डान्सरसह त्यांनी अनेक चित्रपटांत सहकलाकाराची भूमिका साकारूनही प्रेक्षकांची वाहवा मिळवली. 1962 मधील चायना टाऊनमध्ये त्या सपोर्टींग लीड होत्या. 1966 मधील गुमनामसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते. त्यांना पहिला आणि एकमेव फिल्मफेअर पुरस्कार 1980 मधील लहू के दो रंगसाठी सहकलाकार म्हणून मिळाला. 1970 मधील पगला कहीं का मध्ये हेलेन यांनी एका बलात्कार पीडितेची भावनिक भूमिका साकारली.

कपडे स्वतः डिझाईन केलेले आणि मेकअप स्वतःच्या हातांनी

कधी एकसारखा डान्स आणि भूमिका करून त्या टाईप कास्ट ठरल्या, तर कधी त्यांच्यावर वेस्टर्न व्हॅम्पचा शिक्काही बसला. असे असूनही त्यांची ऊर्जा, सौंदर्य, स्टाईल, कपडे ट्रेंड सेटर ठरले. हेलेन यांच्याकडे त्या काळातील सर्वोत्तम टीम होती. असे असूनही त्या स्वतःचा मेकअप स्वतःच करायच्या. डिझायनर्स असूनही स्क्रिनवर दिसणारे त्यांचे कपडेही त्या स्वतःच डिझाईन करायच्या.

त्या त्यांच्या विगला स्वतःच स्टाईल करायच्या. अनेकदा त्यांची गाणी तर केवळ यासाठीच चित्रपटांत टाकली जायची, ज्यांच्या ओढीने प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये यावेत. हेलेन यांना त्या काळातील हिट मशीन म्हटले तर वावगे ठरणार नाही. स्क्रीन रायटरही त्यांना विचारात ठेवूनच चित्रपटांमध्ये गाणी टाकायचे. गोल्डन गर्ल, कॅबरे क्वीन, स्टार हेलेनसारख्या नावांनी त्यांना आळखले जाऊ लागले. त्यांचे चाहते इतके होते की त्यांना गर्दीपासून वाचण्यासाठी बुरखा घालून बाहेर पडावे लागायचे. गीता दत्त आणि आशा भोसलेंनी त्यांच्या गाण्यांना आवाज दिला. अनेकदा त्यांनी काही मिनिटांच्या स्क्रिन टाईममधून संपूर्ण चित्रपटाचे अटेन्शन घेतले होते.

आता कहाणीवर परतूया. हेलेन यांच्या जीवनाचा तिसरा टप्पा जिथे त्यांचे करिअर शिखरावर होते, तेव्हा त्यांनी प्रेमाला जास्त महत्व दिले. ज्या काळात रिलेशनशिप हीच मोठी गोष्ट असायची, त्या काळात हेलेन दिग्दर्शक प्रेम नारायण अरोरांसह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होत्या. काही महिन्यांनी 1957 मध्ये दोघांनी लग्न केले. पीएन अरोरा स्वतः मोठे व्यक्ती होते. पण त्यांची कमाई तेव्हा हेलेन यांच्यापेक्षा कमी होती. लग्नानंतर काही वर्षांतच अरोरा हेलेन यांना न सांगताच त्यांची कमाई उडवायला लागले. हळूहळू हेलेन यांच्याकडील बचत संपायला लागली. लग्न टिकवण्यासाठी हेलेन यांनी 16 वर्षे खूप संघर्ष केला, पण त्यांना यात यश आले नाही. पतीने त्यांची संपूर्ण बचत खर्च करून टाकली आणि त्यांचे घरही बँकेने जप्त केले.

अखेरीस कंटाळून हेलेन यांनी 1974 मध्ये 35 व्या वाढदिवशी पतीला घटस्फोट दिला. वैयक्तिक आयुष्याचा परिणाम त्यांच्या करिअरवरही होत होता. त्यामुळे त्यांना काम मिळणे कमी झाले होते. हेलेन यांच्याकडे घराचे भाडे देण्यासाठीही पैसे नव्हते अशी परिस्थिती आली होती. एक वेळ अशीही होती की, हेलेन यांच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते.

1964 मधील चित्रपट काबिल खानच्या चित्रीकरणादरम्यान हेलेन यांची भेट लेखक-दिग्दर्शक सलीम खान यांच्यासोबत झाली. सोबत काम करताना सलीम खान यांना हेलेन आवडायला लागल्या. पण ते आधीच विवाहित होते आणि त्यांना चार मुले होती. परिस्थिती बघता सलीम यांनी हेलेन यांना मित्र म्हणून निवडले. हेलेन आर्थिक तंगीचा सामना करत होत्या, तेव्हा सलीम त्यांचा सहारा बनले. सलीम यांनी लिहिलेल्या ईमान धर्म, डॉन, दोस्ताना आणि शोलेसारख्या चित्रपटांत हेलेन यांना काम मिळवून दिले.

लहू के दो रंग चित्रपटही सलीम यांच्या मदतीनेच हेलेन यांना मिळाला होता. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्तम सहकालाकाराचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. सोबत असतानाच दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. सलीम खान पत्रकार परिषदेत म्हणाले होते की, मला माहिती नाही माझे केव्हा त्यांच्यासोबत प्रेम झाले आणि केव्हा आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. आम्ही फक्त विचार केला आणि लग्न केले. लग्नानंतर सलीम यांच्या कुटुंबीयांनी त्यांना स्वीकारण्यास नकार दिला. कुटुंबात स्थान मिळण्यासाठीही अनेक वर्षांपर्यंत हेलेन यांना कठोरतेचा सामना करावा लागला. काही वर्षांनंतर सलीम यांच्या कुटुंबाने हेलेन यांना स्वीकारले.

फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत सलमान खान म्हणाला होता की, माझ्या वडिलांनी दुसरे लग्न केल्याने आई नाराज होती. मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो, तिला दुःखी पाहू शकत नाही. आई रात्री उशीरापर्यंत वडिलांची वाट पाहायची, ते पाहून खूप दुःख व्हायचे. त्यामुळे आम्हाला त्यांचा राग येणे स्वाभाविक होते. हळूहळू आईने परिस्थितीशी समझोता केला आणि आम्हीही हेलेन आंटीला स्वीकारले. आज त्या आमच्या कुटुंबाचा एक भाग आहेत.

एका मुलाखतीत हेलेन म्हणाल्या होत्या की, सलीम विवाहित होते आणि त्यांच्यासोबत लग्न केल्यावर मला त्याचा पश्चातापही होत होता. पण सलीम यांच्यात असे काही होते जे त्यांना दुसऱ्यांपेक्षा वेगळे करत होते.

तर सलीम एका मुलाखतीत म्हणाले होते की, हेलेन आल्यावर माझ्या मुलांची प्रतिक्रियाही तशीच होती, जशी त्यांच्या आईची होती. असेही नाही की सलमाने हेलेनला सहज स्वीकारले. जर असे असते तर ती पुरस्कारासाठी पात्र असती.

1983 मध्ये सलीम खान यांच्यासोबत विवाहानंतर हेलेन यांनी चित्रपटांना कायमचा रामराम ठोकला. सलीम आणि हेलेन यांना कोणतीही संतती नाही. दोघांनी अर्पिताला दत्तक घेतले आहे. अनेक वर्षांनंतर हेलेन यांनीही सलमान खानचा चित्रपट खामोशीतून कमबॅक केले. याशिवाय हम दिल दे चुके सनम या चित्रपटात हेलेन यांनी ऑनस्क्रिन सलमानच्या आईची भूमिका साकारली आहे. याशिवाय हमको दिवाना कर गए, मोहब्बतेंसारख्या चित्रपटांतही त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. 1999 मध्ये हेलेन यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...