आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅनिमल लव्हर:भटक्या प्राण्यांच्या जेवणासाठी स्केच बनवून पैसे गोळा करत आहे फराह खानची मुलगी, मिळाल्या अनेक ऑर्डर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चिमुकली अन्या लोकांच्या पाळीव प्राण्यांचे स्केचेस तयार करीत असून ती 1 हजार रुपयांना विकत आहे.

लॉकडाऊनमुळे रस्त्यांवर फिरणारे भटके प्राणी आणि बेघर लोकांना ब-याच अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत फिल्ममेकर फराह खान कुंदरची मुलगी अन्याने त्यांना मदत करण्यासाठी एक अनोखा मार्ग स्वीकारला आहे. ती लोकांच्या पाळीव प्राण्यांचे स्केचेस तयार करीत असून ती 1 हजार रुपयांना विकत आहे. यातून मिळणारे पैसे ती गरजू लोकांसाठी देणगी म्हणून देणार आहे. फराहने तिच्या इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून याबद्दल सांगितले. फराहने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'माझी मुलगी अन्याने पाळीव प्राण्यांचे स्केच बनवून ते 1 हजार रुपयांमध्ये विकण्याचा निर्णय घेतला आहे. यापासून मिळणारे संपूर्ण उत्पन्न भटके प्राणी आणि बेघरांच्या मदतीसाठी देण्यात येईल. जास्त नाही, ती फक्त 12 वर्षांची आहे... अ‍ॅडव्हान्स ऑर्डरसाठी तब्बू, राजीव मसंद, आरती शेट्टी, शाझिया गोवारीकर यांचे आभार.

  • मिळाले ब-याच अ‍ॅडव्हान्स ऑर्डर

फराहची हे पोस्ट वाचल्यानंतर, सर्व यूजर्सनी चिमुकल्या अन्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेक सेलिब्रिटींनी तिला यासाठी अ‍ॅडव्हान्स ऑर्डरदेखील दिल्या आहेत. सानिया मिर्झा, सोनाली बेंद्रे, मनीष पॉल, आदिती राव हैदरी, जोया अख्तर, सोनू सूद आणि ताहिरा कश्यप या सेलेब्रिटींनी अन्याला ऑर्डर दिली आहे. या पोस्टवर तब्बूने लिहिले, 'चिन्नू की चांदी'.

  • यापूर्वी डॉगीजच्या मदतीसाठी दिले पिग्गी बँकेचे सर्व पैसे

एका आठवड्यापूर्वी, अन्याने तिच्या पिग्गी बँकेची संपूर्ण रक्कम स्ट्रिट डॉग्सच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थेत खर्च केली होती. तिने दिलेल्या पैशांतून 30 डॉगीजची आठवड्याभराची जेवणाची व्यवस्था केली गेली. जेव्हा फराहने तिच्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून या कामात मदत करणा-यांचे आभार मानले, तेव्हा ही गोष्ट उघड झाली होती.  

बातम्या आणखी आहेत...