आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाहिरात वाद:'आटा आणि ब्रेडमेकर'च्या जाहिरातीवरून सुरु झालेल्या टीकेला तोंड देताना हेमा मालिनी म्हणाल्या - मी समाजातील सर्वच वर्गांचा सन्मान करते...

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्विटरवर अनेक यूजर्सनी या जाहिरातीचे स्क्रिनशॉट्स शेअर केले आहेत.

'आटा आणि ब्रेडमेकर'च्या जाहिरातीवरुन टीकेला तोंड देत असलेल्या हेमा मालिनी यांनी ट्विटरवर स्पष्टीकरण दिले आहे. हेमा मालिनी यांच्यावर या जाहिरातीच्या माध्यमातून भेदभाव पसरवण्याचा आरोप होता.

या आरोपावर स्पष्टीकरण देताना हेमा यांनी ट्विटरवर लिहिले की, 'जाहिरातीमध्ये जे दाखवले गेले ते माझ्या तत्त्वांच्या विरोधात आहे. मी समाजातील सर्व घटकांचा आदर करते.' हेमा मालिनी म्हणाल्या की, कंपनीच्या अध्यक्षांनीही या जाहिरातीवर जाहीरपणे माफी मागितली आहे. त्यांनी कंपनीच्या चेअरमनचा माफीनामाही पोस्ट केला आहे. यात लिहिलं की, कंपनीचे चेअरमनही अशा विचारांचे समर्थन करत नाहीत. हेमा मालिनी या कंपनीच्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहेत. या ब्रॅण्डच्या टीव्ही आणि प्रिंटच्या जाहिरातीत त्या मुलगी ईशा देओलसह झळकल्या आहेत. 

  • काय होता वाद?

ट्विटरवर अनेक यूजर्सनी या जाहिरातीचे स्क्रिनशॉट्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात दाखवण्यात आले की, तुमची मेड हाताने पीठ मळते का? तिचे हात संक्रमित असू शकतात. यावरच लोकांनी आक्षेप घेतला होता. जाहिरातीमध्ये कंपनीने त्यांचे आटा आणि ब्रेकमेकर वापरण्याचा सल्ला दिला आहे. 

  • कंपनीने जाहिरातीवर काय म्हटले?

कंपनीचे चेअरमन महेश गुप्ता यांनी ट्विटरवर स्पष्टीकरण देताना म्हटेल, आटा मेकरची ही जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आमचा हेतू चुकीचा नव्हता, परंतु तो चुकीच्या पद्धतीने प्रसारित झाला. आम्ही ही जाहिरात काढली आहे. आम्ही समाजातील प्रत्येक घटकाचा आदर करतो.

बातम्या आणखी आहेत...