आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाला 40 वर्षांहून अधिकचा काळ उलटून गेला आहे. पण हेमामालिनी यांनी सांगितल्यानुसार, धर्मेंद्र यांनी त्यांना लग्नानंतर जास्त वेळ दिला नाही. 16 ऑक्टोबर रोजी हेमामालिनी यांनी वयाची 72 वर्षे पूर्ण केली. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांना आपल्या आयुष्यात एखाद्या गोष्टीचा बदल करु इच्छितात का? असा प्रश्न विचारला गेला होता. त्यावर त्यांनी आपले मन मोकळे केले.
स्पॉटबॉयशी बोलताना हेमा म्हणाल्या, "आयुष्यात काहीही बदल करायचा आहे, असे मला वाटत नाही. मला धरमजीबरोबर जास्त वेळ घालवता आला नाही. पण ते ठीक आहे. आम्ही एकत्र घालवलेला सर्व वेळ अमूल्य होता. आम्ही 'तू हे का केले नाहीस?', 'त्याने असे का केले नाही?', 'तुला उशीर का झाला?' अशा गोष्टींमध्ये अडकलो नाही."
21 ऑगस्ट 1979 रोजी हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांचे लग्न झाले होते. असे म्हणतात की, ख्वाजा अहमद अब्बास यांच्या 'आसमान महल' चित्रपटाच्या प्रीमिअरच्या वेळी 1965 मध्ये या दोघांची पहिली भेट झाली होती. मात्र 'शोले' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यात सूत जुळले. हेमा या धर्मेंद्र यांच्या दुस-या पत्नी आहे. प्रकाश कौर हे त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव असून सनी देओल आणि बॉबी देओलच्या त्या आई आहेत.
राम कमल मुखर्जी यांच्या 'हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल' या पुस्तकानुसार हेमा लग्नानंतर धर्मेंद्र यांच्या घरी कधीच गेल्या नाहीत. हेमा यांनी सांगितल्यानुसार, मला कुणालाही त्रास द्यायचा नव्हता. धरम जी यांनी माझ्यासाठी व माझ्या मुलींसाठी जे केले त्याबद्दल मला आनंद आहे. त्यांनी वडिलांची भूमिका चांगली निभावली. आजही मी काम करते आणि आपला मान कायम राखण्यात सक्षम आहे. कारण मी माझे जीवन कला आणि संस्कृतीशी जोडले आहे."
हेमा एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या- ''मी कधी प्रकाश यांच्याविषयी काही बोलत नसले तरी मनापासून त्यांचा खूप आदर करते. माझ्या मुलींनाही धरमजींच्या कुटुंबाबद्दल पूर्ण आदर आहे. जगाला माझ्या आयुष्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे. पण मला ते सांगण्यात रस नाही. ''
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.