आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुनील कोठारी यांचे निधन:हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला शोक, म्हणाल्या - त्यांनी करिअरच्या सुरुवातीच्या काळात मला प्रोत्साहन दिले होते

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुनील कोठारी यांना महिनाभरापूर्वी कोरोनाची लागण झाली होती.

87 वर्षीय नृत्य इतिहासकार व समीक्षक सुनील कोठारी यांचे रविवारी सकाळी दिल्ली येथील रुग्णालयात निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनावर अभिनेत्री हेमा मालिनी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले, 'महान नृत्य इतिहासकार सुनील कोठारी यांचे निधन झाले आहे. माझ्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात मला प्रोत्साहन देणा-यांपैकी ते एक होते. ते एक कला प्रेमी आणि एक हुशार व्यक्ती होते. शास्त्रीय नृत्यात त्यांनी रस घेतला आणि तरुण नर्तकांना प्रोत्साहन दिले. सुनील जी तुम्ही कायम आठवणीत राहाल,'' अशा शब्दांत हेमा मालिनी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

कोरोनाची लागण झाली होती.
सुनील कोठारी यांना महिनाभरापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या एका निकटवर्तीयाने दिलेल्या माहितीनुसार, 'गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. एक महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. घरीच त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.'

सुनील कोठारी यांना पद्मश्री किताबाने गौरविण्यात आले होते. त्यांचा जन्म 20 डिसेंबर 1933 रोजी मुंबईत झाला. ते चार्टर्ड अकाउंटंट होते. नंतर ते भारतीय नृत्य प्रकारांच्या अभ्यासाकडे वळले. त्यांनी वीस पुस्तके लिहिली असून त्यात भारतीय नृत्य प्रकारांवर नवा प्रकाश टाकला आहे. त्यात सत्रिया डान्सेस ऑफ आसाम, न्यू डायरेकशन्स इन इंडियन डान्स ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. भरतनाटय़म, ओडिशी, छाहू, कथ्थक, कुचीपुडी या नृत्य प्रकारांवर त्यांनी लेखन केले. रबींद्र भारती विद्यापीठाच्या उदय शंकर अध्यासनाचे ते प्रमुख होते. त्यांनी न्यूयॉर्क विद्यापीठाच्या नृत्य विभागात अध्यापन केले होते.

बातम्या आणखी आहेत...