आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेट्रो प्रवासाचा आनंद:आधी मेट्रो आणि नंतर रिक्षातून प्रवास करताना दिसल्या हेमा मालिनी, ड्रीमगर्लला अचानक पाहून चाहते चकित

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी नुकताच मुंबई मेट्रो प्रवासाचा आनंद घेतला. मुंबईच्या ट्रॅफिकमुळे हेमा यांनी आज मेट्रो आणि रिक्षातून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. स्वतः त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या प्रवासाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. ड्रीमगर्लला अचानक मेट्रोत बघून प्रवाशांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

हेमा मालिनी यांनी ट्वीट करीत या प्रवासाचा अनुभव सांगितला. त्यांनी या प्रवासादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत लिहिले, "आज मला तुमच्याबरोबर एक खास अनुभव शेअर करायचा आहे. मला कारने दहिसरला पोहोचायला दोन तास लागले. तो खूप कंटाळवाणा प्रवास होता. त्यामुळे संध्याकाळी मी परत येताना कारऐवजी मेट्रोने येण्याचा निर्णय घेतला. काय मजेदार अनुभव होता तो! मी अर्ध्या तासात जुहूला पोहोचले," असे हेमा यांनी सांगितले.

हेमा मालिनी यांना मेट्रोमध्ये पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्याबरोबर मेट्रोत सेल्फीही काढले. इतकेच नाही तर ‘मेट्रो प्रवासा’नंतर हेमा यांना रिक्षा प्रवासाचाही आनंद घेतला. डी.एन.नगर ते जुहू असा त्यांनी रिक्षातून प्रवास केला.

या प्रवासाचा व्हिडिओ पोस्ट करीत त्यांनी लिहिले, "हा व्हिडिओ मी रिक्षातून शूट केला आहे. मी स्वतः याचा खूप आनंद घेतला!" असे त्या म्हणाल्या.