आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी:फोटो शेअर करत हेमा यांनी दिल्या धर्मेंद्र यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाल्या - मी खूप भाग्यवान आहे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1980 मध्ये झाला होता या कपलचा विवाह

अभिनेत्री आणि राजकारणी हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाचा आज 42 वा वाढदिवस आहे. या खास निमित्ताने हेमा यांनी पती धर्मेंद्र यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोसोबत त्यांनी लिहिलेले कॅप्शन लक्ष वेधून घेत आहेत. धर्मेंद्र यांना प्रकृती अस्वस्थामुळे पाच दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ते रविवारी संध्याकाळी रुग्णालयातून घरी परतले आहेत. हेमा मालिनी यांनी धर्मेंद्रसोबतचा फोटो केला शेअर

धर्मेंद्र यांच्यासोबतचा एक सुंदर फोटो शेअर करत हेमा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, "आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. मला मिळालेला एवढा आनंद, आमची मुले, नातवंडे आणि शुभेच्छांसाठी देवाचे आभार मानते. मी खरोखर खूप भाग्यवान आहे," असे हेमा म्हणाल्या आहेत.

हेमा यांनी मानले चाहत्यांचे आभार
हेमा यांनी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीसाठी चाहत्यांना धन्यवाद देणारी नोटही लिहिली आहे. त्यांनी ट्विट केले, "धरमजींच्या प्रकृतीविषयी विचारणा करणाऱ्या सर्व हजारो शुभचिंतकांचे मी आभार मानू इच्छिते. ते काही दिवस रुग्णालयात होते, पण आता ते बरे आहेत आणि घरीही परतले आहेत. शुभेच्छांसाठी तुम्हा सर्वांचे आभार."

1980 मध्ये झाला होता या कपलचा विवाह
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी 1980 मध्ये लग्न केले होते. दोघांना ईशा देओल आणि आहाना देओल या दोन मुली आहेत. 1970 मध्ये 'तुम हसीन मैं जवान'च्या शूटिंगदरम्यान दोघांची भेट झाली होती. दोघांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. हेमा धर्मेंद्र यांच्या दुसरी पत्नी आहेत, त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कौर आहे.

धर्मेंद्र यांना रुग्णालायात दाखल करण्यात आले होते
मागच्या आठवड्यात धर्मेंद्र यांना पाठीच्या मसल स्ट्रेनमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चार दिवस रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या शूटिंगदरम्यान स्नायू खेचल्यामुळे त्यांना पाठदुखीचा तीव्र त्रास झाला होता, त्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...