आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्थडे स्पेशल:पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच धर्मेंद्र यांनी थाटले होते हेमामालिनीसोबत दुसरे लग्न, जाणून घ्या लग्नानंतर काय म्हणाली होती पहिली पत्नी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर म्हणाल्या होत्या, एक आई आणि एक पत्नी म्हणून मी तिला कधीही माफ करु शकत नाही.

बॉलिवूडची ड्रीमगर्ल म्हणून ओळखल्या जाणा-या अभिनेत्री हेमा मालिनी यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 72 वर्षे पूर्ण केली आहेत. 16 ऑक्टोबर 1948 रोजी तामिळनाडू येथे जन्मलेल्या हेमा यांनी 1980 मध्ये बॉलिवूडचे हीमॅन अर्थातच अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न थाटले. दोघांना धर्म बदलून लग्न करावे लागले होते. याचे कारण म्हणजे धर्मेंद्र विवाहित होते. होय, धर्मेंद्र यांनी त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांना घटस्फोट न देताच हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केले होते. 1954 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी धर्मेंद्र यांचे प्रकाश कौर यांच्यासोबत अरेंज्ड मॅरेज झाले होते. या दाम्पत्याला एकुण चार मुले आहेत. अजय सिंह (सनी), विजय सिंह (बॉबी), विजेता आणि अजेता देओल ही त्यांच्या मुलांची नावे आहेत.

धर्मेंद्र यांच्या दुस-या लग्नानंतर अनेक प्रकारच्या बातम्या मीडियात आल्या होत्या. असेही म्हटले गेले होते, की सनी देओलने हेमा मालिनी यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. मात्र जेव्हा या बातम्या आल्या होत्या, तेव्हा प्रकाश कौर यांच्याशी माध्यमांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्यांनी म्हटले होते, की धर्मेंद्र यांची बाजू घेताना म्हटले होते, की ते एक चांगले पती नसतील, मात्र एक खूप चांगले वडील आहेत. प्रकाश कौर यांनी 1981मध्ये स्टारडस्ट या प्रसिद्ध मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत हे म्हटले होते. या मुलाखतीचा हा खास भाग वाचकांसाठी...

मुलाखतीसाठी तयार नव्हत्या प्रकाश कौर

धर्मेंद्र यांच्याविषयी होणा-या उलटसुलट चर्चांमुळे प्रकाश कौर चांगल्याच वैतागल्या होत्या. त्या म्हणाल्या, ''माझ्या नव-याविषयीची का उलटसुलट चर्चा होत आहेत.. अर्धी इंडस्ट्री हेच करतेय. कितीतरी हीरोंचे अफेअर असून अनेकांनी दुसरे लग्न केले आहे. तुम्ही त्यांना का प्रश्न विचारत नाहीत, माझी मुलाखत घ्यायला का आले.''

मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, प्रकाश कौर यांची मुलाखत घेणे हे सोपे काम नव्हते. त्या फोनवर कुणाशी बोलायच्या नाही, शिवाय घरीसुद्धा कुणाला भेटायच्या नाही. रिपोर्टर दररोज त्यांच्या घरी फे-या घालायची, मात्र तिला कोणतेही कारण देऊन परत पाठवून द्यायचे. कधी सांगितले जायचे, की प्रकाश कौर घरी नाहीत, तर कधी त्या झोपल्या आहेत, असे रिपोर्टरला सांगितले जायचे. मात्र सरतेशेवची रिपोर्टरच्या प्रयत्नांना यश आले आणि प्रकाश कौर मुलाखत द्यायला तयार झाल्या.

इंग्रजी येत नसल्याचे दिले होते कारण
मुलाखतीदरम्यान प्रकाश कौर यांनी इंग्रजी येत नसल्याचे कारण दिले होते. त्यांनी रिपोर्टरला म्हटले होते, की ''माझी इंग्रजी चांगली नाहीये. त्यामुळे मी काहीही सांगू शकत नाही.'' जेव्हा रिपोर्टर तेथून जायला तयार झाली नाही, तेव्हा प्रकाश कौर म्हणाल्या, "मी एक गृहिणी आहे. माझे माझ्या घरावर आणि मुलांवर जीवापाड प्रेम आहे. लोक माझ्या राहणीमानाविषयी काय म्हणतात, हे मला ठाऊक नाही. सर्वांचे स्वतःचे एक राहणीमान असते."

'धर्मेंद्र माझ्या आयुष्यात येणारे पहिले आणि शेवटचे पुरुष'
मुलाखतीत प्रकाश कौर म्हणाल्या होत्या, की धर्मेंद्र त्यांच्या आयुष्यात येणारे पहिले आणि शेवटचे पुरुष आहेत. त्या पुढे म्हणाल्या, ते माझ्या मुलांचे वडील आहेत. माझे त्यांच्यावर खूप प्रेम आहे. मी त्यांचा आदर करते. जे घडतंय, त्यासाठी मी काहीही करु शकत नाही. मी त्यांना दोषी ठरवावे, की नशीबाला हे मला माहित नाही. मला एक गोष्ट ठाऊक आहे, ती म्हणजे, ते माझ्यापासून कितीही दूर गेले, तरीदेखील जेव्हा मला त्यांची गरज असेल, तेव्हा ते नक्कीच माझ्याजवळ असतील. मी त्यांच्यावरचा माझा विश्वास गमावलेला नाही. काहीही झाले तरी ते माझ्या मुलांचे वडील आहेत.

'ते एक खूप चांगले वडील आहेत'
प्रकाश कौर यांनी मुलाखतीत म्हटले होते, की धर्मेंद्र एक चांगले पती होऊ शकले नाहीत, मात्र ते एक खूप चांगले वडील आहेत. त्यांचे आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम आहे. ते कधीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत नाहीत. ते अजय (सनी) ला बॉलिवूडमध्ये लाँच करत आहेत. सर्वांना वाटतं, की त्यांनी सनीला बॉलिवूडमध्ये लाँच केले, तरच हेमासोबत लग्न करु शकतील, अशी मी त्यांच्याशी डील केली आहे. मात्र हे खरे नाहीये. असे कसे होऊ शकते. सनी त्यांचा मुलगा नाहीये का? मी जेवढे सनीवर प्रेम करते, तेवढेच ते देखील करतात.

सनीने केला होता हेमावर चाकूने हल्ला?
जेव्हा प्रकाश कौर यांना हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी म्हटले होते, हे सत्य नाहीये. प्रत्येक मुलाला वाटतं, की त्याचे वडील केवळ त्याच्या आईचेच असावे. याचा अर्थ हा होत नाही, की तो मुलगा त्या दुस-या स्त्रिला मारुन टाकेल, जी त्याच्या वडिलांवर प्रेम करते. मी जास्त शिकलेली नाही. मात्र माझ्या मुलांच्या नजरेत, मी जगातील सर्वात सुंदर स्त्री आहे. मी माझ्या मुलांवर चांगले संस्कार केले आहेत. आणि हे ठामपणे सांगू शकते, की माझी मुले कधीही कुणाला नुकसान पोहोचवणार नाही.

हेमाविषयी सहानुभूती आणि तक्रारसुद्धा
प्रकाश यांच्या मते, लोक त्यांच्या आणि धर्मेंद्र यांच्या नात्याविषयी काय चर्चा करतात हे त्यांना ठाऊक नाही. त्यांनी मुलाखतीत पुढे म्हटले होते, "ते आमच्या सर्वांची खूप काळजी घेतात, हे मला ठाऊक आहे. रोज संध्याकाळी घरी घेतात आणि मुलांसोबत वेळ घालवतात." यावेळी प्रकाश यांच्या मनात हेमा यांच्याविषयी सहानुभूती आणि तक्रार दोन्ही दिसून आले. त्या म्हणाल्या, "हेमा यांनाही जगाचा सामना करावा लागतो, हे मला ठाऊक आहे. मित्र, नातेवाईकांच्या प्रश्नांना तिला सामोरे जावे लागतेय. एक स्त्री असल्यामुळे मी तिची फिलिंग समजू शकते. मात्र मी जर हेमाच्या जागी असते, तर नक्कीच तिने जे केले, ते केले नसते. एक आई आणि एक पत्नी म्हणून मी तिला कधीही माफ करु शकत नाही."

बातम्या आणखी आहेत...