आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या हेमामालिनी यांनी 16 सप्टेंबर रोजी आपला 72 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त ‘दिव्य मराठी’ने त्यांच्याकडून वाढदिवसाचे रंजक किस्से जाणून घेतले. वाचा त्यांच्याच शब्दात...
लहानपणी आई-वडील वाढदिवस कसा साजरा करत होते, हे तर मला माहीत नाही आणि मोठी झाल्यावरही मी काही विशेष प्रकारे माझा वाढदिवस साजरा केला नाही. मात्र ‘सपनों का सौदागर’ चित्रपट करत होते तेव्हा त्याचे निर्माते अनंत स्वामीने विचारले, हेमाचा वाढदिवस कधी आहे? त्यांनी करार तपासला आणि म्हणाले, आता तर सेलिब्रेशन व्हायलाच हवे. त्या दिवसांपासून माझा वाढदिवस चांगल्या प्रकारे साजरा होऊ लागला. मद्रासमध्ये केक कापण्यात आाला. त्या दिवशी मी पहिल्यांदाच केक कापला होता. कारण लहानपणी केक वगैरे काही नसायचे. आजकाल तर प्रत्येक मुलाला आधी केक हवा असतो.
मला आठवतेय, माझी मोठी मुलगी ईशाचा पहिला वाढदिवस आम्ही मोठ्या थाटात साजरा केला होता. इंडस्ट्रीतील अनेक मोठे लोक आले हाेते. ऋषी कपूर यांचे मुले होती, शत्रुजी यांची मुले होती. आहना (धाकटी मुलगी) चा वाढदिवसही आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा केला. मात्र माझ्या वाढदिवशी कधी कोणतीच थीम ठेवली नाही. मोठी झाल्यावर चित्रपटाच्या सेटवरच वाढदिवस साजरा होऊ लागला. निर्मात्यांनाही चांगले वाटायचे, हेमा काम करत आपला वाढदिवस साजरा करते. वाढदिवशी लोक काही गिफ्ट द्यायचे. काही विचित्रच द्यायचे. माझ्या साइजचे फोटो फ्रेम द्यायचे. त्यांना कुठे ठेवायचे हा प्रश्न पडायचा. मला तर माझ्या जवळचे लोक आले तरी चांगले वाटते. फुलांनी घर सजवलेले अावडते. त्या कारणाने का होईना विविध फूल पहायला मिळतात.
धरमजी माझ्या प्रत्येक वाढदिवसाला दागिने घेऊन येत असत. कधी सुंदर हार आणायचे तर कधी अंगठी तर कधी बांगड्या, ब्रेसलेट. तेव्हा सर्व काही चांगलं वाटायचं. नंतर-नंतर मीच त्यांना नको म्हटलं. आताही काहीतरी आणले आहे. ते पाहून तर मी चकित झाले. त्यांनी कुठून तरी विशेष बनवून घेतले आहे. ते एक वॉटरफॉलसारखे आहे. चार फुटाचे आहे. फायबरचे आहे. ते पाहुन मी त्यांना म्हणाले, इतके मोठे कुठे ठेऊ. कारण मुंबईत फ्लॅट संस्कृती आहे, जागा कमी आहे. येथे गार्डन नाहीत. मात्र त्यांनी इतक्या प्रेमाने ठेवण्याचे सांगितले की, मी नकार देऊ शकले नाही.
राजकीय क्षेत्रातून कधीच कोणतेच सरप्राइज आले नाही. मोदीजी आणि योगीजी यांच्याकडून तर आतापर्यंत काहीच आले नाही. ते शुभेच्छादेखील देत नाहीत. त्याचं काही वाटत नाही. कारण सर्वांचा वाढदिवस लक्षात ठेवणे गरजेचे नाही. मी ती अपेक्षाही ठेवत नाही. मात्र इंडस्ट्रीत रेखा माझी जवळची मैत्रीण आहे. ती नेहमी संपर्कात राहते. 10 ला त्यांचा वाढदिवस असतो, 11 अमिजी यांचा नंतर माझा आणि 19 ला सनी देओलचा असतो. कुटुंबात ईशा आणि आहना मला लहानपणी कार्ड बनवून द्यायच्या. आता माझ्या नातीदेखील असेच करतात. ते वाकडे-तिकडे असते, मात्र चांगले वाटते.
माझ्या वाढदिवशी मी एकदा गझल कार्यक्रम आयोजित केला हाेता. एका कलाकाराला बोलवले हाेते पण सर्व लाेक कंटाळले. तो कलाकार सतत गझल ऐकवत होता. त्यामुळे सर्वजण सेलिब्रेशन साेडून गझल ऐकत राहिले. वाढदिवशी रात्रीच्या जेवणाची सर्व तयारी मीच करते. लंचमध्ये दक्षिण भारतीय पदार्थ असतात. संध्याकाळीही बऱ्याच प्रकारचे पदार्थ असतात. हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्यासोबत कोणीच खोडकरपणा करत नाही. म्हणजे आजकाल मुलांच्या चेहऱ्यावर कसा केक लावला जातो, तसे करण्याची कोणी हिंमत करत नाही. धरमजी यांनाही असे करण्याची परवानगी नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.