आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जयंती विशेष:संगीतकाराच्या रूपात ईश्वराचा आवाज... जाणून घ्या हेमंत कुमार यांच्याविषयीच्या खास गोष्टी

मुंबई10 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • 1956 मध्ये ‘नागिन'साठी सर्वोत्तम संगीत दिग्दर्शकाचा फिल्मफेअर अवॉर्ड
 • 1962-76 पर्यंत बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशनद्वारे ‘स्वरलीपि', ‘20 साल बाद', पालातक, मिनिहार, बालिका वधू, फुलवारी, भोलोबासा भालोबासा, पाथभोला, आगमन, धन्नी मेये, फुलेश्वरी, प्रिया बंधोबी या चित्रपटांसाठी बेस्ट म्युझिक डायरेक्टर आणि प्लेबॅक सिंगर अशी पारितोषिके मिळाली.
 • 1971 मध्ये ‘निमंत्रण' या बंगाली चित्रपटासाठी बेस्ट प्लेबॅक सिंगरचा नॅशनल फिल्म अवॉर्ड
 • 1985 मध्ये विश्वभारती विश्वविद्यालयद्वारे मानद डी. लिट. पदवी देण्यात आली.
 • 1986 मध्ये ‘ललन फकीर'साठी बेस्ट प्लेबॅक सिंगरच्या रूपात नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाला.
 • 1989 मध्ये मायकल मधुसूदन पुरस्कार देण्यात आला.

आज आपण भारतीय चित्रपटसृष्टीच्या अशा संगीतकाराबद्दल बोलणार आहोत ज्यांना सदाबहार गाण्यांचा सम्राट म्हणणे चुकीचे ठरणार नाही. बंगाली असो वा हिंदी, त्यांनी आपली लेखणी आणि आवाजाच्या जादूने दोन्ही भाषांतील संगीतप्रेमींचे मन जिंकले होते. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाचा घेतलेला आढावा...

हेमंत कुमार यांचा जन्म 1920 मध्ये बनारस इथे झाला. त्यांना शालेय अभ्यासापेक्षा संगीताची अधिक आवड होती. यामुळेच इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेऊनही त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय संतापलेही होते. ही त्या वेळची गोष्ट आहे जेव्हा त्यांच्या घरचे गाणे, संगीत या क्षेत्राला चांगले समजत नव्हते. कुटुंबीयांनी अनेक प्रकारे बंधने आणण्याचा प्रयत्न केला, तरीही त्यांनी संगीत क्षेत्रात पाऊल ठेवलेच.

 • अनेक म्युझिक कंपन्यांनी ऑडिशनमध्ये नाकारला होता त्यांचा आवाज

हेमंत कुमार यांनी यश संपादित करण्याआधी त्यांनी अनेक रेकॉर्ड कंपन्यांमध्ये ऑडिशन दिली होती, पण त्यांना तिथे नाकारण्यात आले होते. तुमचा आवाज गायनासाठी योग्य नाही, असे कारण अनेक म्युझिक कंपन्यांनी त्यांना दिले होते. त्यानंतर एका कोलंबिया म्युझिकने रवींद्रनाथ टागोर यांचे गाणे त्यांच्या आवाजात रेकॉर्ड केले. हेमंत यांना पहिल्यांदा पंडित अमरनाथ यांच्या संगीत दिग्दर्शनात ‘इरादा’ (1944) या चित्रपटासाठी गाण्याची संधी मिळाली. त्या काळात ते पंकज मलिक यांचे चाहते होते. अनेक लोक त्यांना ‘छोटा पंकज’ या नावाने संबोधू लागले. 

 • प्रख्यात गायक के. एल. सहगल यांना गाणे ऐकवून इम्प्रेस केले होते

40 च्या दशकात हेमंत कुमार मुंबईत आले आणि इथे त्यांची भेट गीतकार नौशाद यांच्याशी झाली. हेमंत कुमार यांनी नौशाद यांना सांगितले की मी हिंदीत खूप कमी गाणी गायली आहेत. पण मी एक गाणे तुम्हाला ऐकवू इच्छितो. तो असा काळ होता की त्या वेळी के. एल. सहगल यांच्याप्रमाणे खालच्या सुरात गाणी गायली जायची. हेमंत यांनी खालच्या सुरातच नौशाद यांना गाणे ऐकवले. नौशाद साहेब खूप खूश झाले. त्यानंतर त्यांनी दोन गाणी रेकॉर्ड केली. त्यातील एक गाणे ‘चंदन का पलना, रेशम की डोरी...’ हे ‘शबाब’ चित्रपटातील, तर दुसरे ‘इंसाफ की डगर पर बच्चों दिखाओ चलके...’ हे ‘गंगा जमना’ या चित्रपटातील आहे. ही दोन्ही गाणी सुप्रसिद्ध ठरली.

 • ‘आनंदमठ’ या चित्रपटाने संगीतकार म्हणून ओळख मिळाली

1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याच वर्षी पहिल्यांदा एका चित्रपटाच्या संगीत निर्मितीसाठी हेमंत यांना संधी मिळाली. याच दिवसांत ते इप्टाशी जोडले गेले. तिथे त्यांची मैत्री सलील चौधरींशी झाली. इप्टासाठी लिहिणे- गाणे या दोन्ही गोष्टी सुरू होत्या.  50 च्या दशकात दिग्दर्शक हेमन गुप्ता यांनी त्यांना मुंबईत बोलावले. ते ‘आनंदमठ’ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट बनवत होते. तो बंकिमचंद्र चॅटर्जींच्या आनंदमठ या कादंबरीवर आधारित होता. त्यातील ‘वंदे मातरम’ हे गाणे हेमंत यांनी कंपोज केले, ते आजही गायले जाते. यानंतर 1952 मध्ये ते खूप यशस्वी झाले. गुरुदत्त ‘जाल’ चित्रपट तयार करत होते. याच चित्रपटामुळे हेमंत यांची गायक म्हणून ओळख निर्माण झाली. त्यानंतर ‘जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला’ हे गाणे गाऊन त्यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःचे पाय घट्ट रोवले. यानंतर गुरुदत्त यांनी पुन्हा त्यांना ‘साहब बीबी और गुलाम’ या चित्रपटाची संगीत निर्मितीची जबाबदारी सोपवली.

 • निर्मात्याच्या भूमिकेतही यशस्वी

प्रत्येक कलाकार आयुष्यात चित्रपट निर्मितीचा विचार करतो. फिल्मीस्तान हा स्टुडिओ बंद पडण्याच्या मार्गावर होता. हेमंत कुमार यांनी ‘हेमंता बेला प्रॉडक्शन’ नावाने खूप प्रसिद्ध चित्रपटांची निर्मिती केली. त्यांना रहस्यमय आणि रोमांचक चित्रपट निर्मितीची आवड होती. विशेष म्हणजे त्यांचे संगीत चित्रपटाच्या पटकथेपेक्षा सरस ठरत होते. ‘बीस साल बाद’मध्ये ‘कहीं दीप जले कहीं दिल’, तर ‘कोहरा’ चित्रपटात ‘झूम झूम ढलती रात’ यांसारख्या गाण्यांमध्ये ‘हाँटिंग इफेक्ट’ दाखवला आहे. त्यानंतर ‘खामोशी’मुळे त्यांना मोठे यश मिळाले. ‘तुम पुकार लो....’, लता मंगेशकर यांचे गाणे ‘हमने देखी है उन आंखों की महकती खुशबू....’, किशोर कुमार यांचे ‘वो शाम कुछ अजीब थी.....’ ही गाणी खूप प्रसिद्ध झाली.

 • आजारपणातून उठून लता दीदींनी हेमंतकुमारांसाठी गायले होते गाणे

ही घटना ‘बीस साल बाद’च्या गाण्यांच्या रेकॉर्डिंगच्या वेळची आहे. रेकॉर्डिंग सुरू होण्याआधी लता मंगेशकर यांची तब्येत बिघडली होती. हेमंत कुमार यांनी संगीत दिग्दर्शक आणि निर्मात्यांना गाणे रेकॉर्ड करण्यासाठी तयार केले होते. आजारी असल्यामुळे लता आल्या नाहीत. त्यांना जेवणातून कोणी तरी विष देण्याचा प्रयत्न करत आहे, अशी चर्चा होती. तीन महिन्यांनंतर लता मंगेशकर यांची प्रकृती ठीक झाली. त्यानंतर त्यांनी पहिले गाणे ‘कहीं दीप जले कहीं दिल’ हे गायले. या गाण्यामुळे हेमंत कुमार यांचा चित्रपट प्रसिद्ध झाला.

 • मोठ्या गायकांनी हेमंत यांच्या दिग्दर्शनाखाली गायली गाणी

हेमंत कुमार यांची विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या संगीत दिग्दर्शनाखाली त्या काळातील मोठ्या गायकांना गाणी गायला लावली. महंमद रफी, तलत महमूद ते किशोर कुमारपर्यंत सर्वांनी हेमंत कुमार यांच्या संगीत दिग्दर्शनात पार्श्वगायन केले. ‘खामोशी’तील ‘वो शाम कुछ अजीब थी ये शाम भी अजीब है’ या गाण्याला हेमंत कुमार यांचेच संगीत होते. बांगला संगीतात हेमंत कुमार यांच्या जवळपास कुणीच नाही. तिथे रवींद्र संगीत आणि आधुनिक संगीताशिवाय गायक म्हणूनही त्यांचे नाव मोठे आहे. चित्रपट संगीतात आधुनिकतेचा परिचय हेमंतदांनी करून दिला. 70 आणि 80 च्या दशकात आधुनिकतेच्या नावावर विदेशी गाण्यांची नक्कल करण्याचा काळ होता. यामुळे हेमंत कुमार यांनी निराश होऊन काम करणे बंद केले.

 • सलील चौधरी आणि लता मंगेशकर यांनीही आवाजाची प्रशंसा केली

हेमंत कुमार यांनी ज्या दिग्गज संगीतकारांच्या सान्निध्यात करिअरची सुरवात केली होती त्यात कमल दासगुप्ता, पंडित अमरनाथ, सलील चौधरी यांचा समावेश होता. कोलंबिया म्युझिकने त्यांच्या गाण्यामुळे प्रभावित होऊन एकाच वर्षात रवींद्रनाथ टागोर यांचे गाणे त्यांच्या आवाजात रेकॉर्ड केले होते. ते असे गायक होते ज्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या गाण्यात न्यू थिएटर्सचे पंकज मलिक यांच्या आवाजाचा त्यांच्यावर प्रभाव जाणवत होता. त्यामुळेच त्यांना ‘छोटा पंकज’ असे संबोधले जात होते. या प्रभावातून बाहेर पडण्यासाठी त्यांना त्यांचे मित्र सलील चौधरी यांनी खूप मदत केली. सलील हेमंत यांना म्हणाले होते की, जर ईश्वर गाणे गात असेल तर त्याचा आवाज तुमच्यासारखा असेल. लता मंगेशकर म्हणाल्या होत्या की, हेमंतकुमारांना ऐकल्यावर असे वाटते की एखादा साधूच मंदिरात बसून गाणे गातोय.

 • ‘मन डोले मेरा तन डोले’ गाण्यात क्लृप्तीने तयार केली धून

1954 मध्ये आलेल्या ‘नागिन’ चित्रपटाचे संगीत तुमच्या आजही लक्षात असेल. त्यात एक गाणे होते ‘मन डोले मेरा तन डोले.’ त्यात पुंगीचा आवाज ऐकू येतो. खरे तर तो पुंगीमधून आलेला आवाज नव्हता तर यासाठी हेमंत कुमार यांनी एक युक्ती लढवली होती. क्ले व्हायोलिनचे साधक कल्याणजी आणि हार्मोनियमचे मास्टर रवी यांना बसवून त्यांच्याकडून हे संगीत तयार करून घेतले होते. कल्याणजी आणि रवी यानंतर स्वतः संगीत दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरले. या चित्रपटाचे पूर्ण संगीत हेमंत कुमार यांनीच केले होते. या काळात एक ट्रेंड सुरू होता की कोणत्या संगीतकाराचे स्वर वरच्या स्थानावर असतील. मोठमोठ्या संगीतकारांना मागे टाकून हेमंत कुमार ‘नागिन’चे संगीत वाजवत पुढे निघून गेले. याच दिवसांत ते इतके प्रसिद्ध झाले की रोज विमानाने मुंबई आणि कलकत्ता असा प्रवास करायचे. अशा रोजच्या प्रवासामुळे एअर इंडियाने त्यांना डेली पॅसेंजर असा किताब दिला होता.

बातम्या आणखी आहेत...