आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांतचे धोनी कनेक्शन:महेंद्रसिंग धोनी होण्यासाठी सुशांतने 13 महिने घेतले होते ट्रेनिंग, स्वत: सांगितले होते धोनीसोबतचे साम्य

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चार वर्षांपूर्वी सुशांतने पडद्यावर एम.एस. धोनीचे पात्र साकारले होते.
  • 2016 चा चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता 'एम.एस. धोनी '

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. तथापि, तो आयपीएल खेळत राहणार आहे. चार वर्षांपूर्वी, पडद्यावर अभिनेता सुशांत सिंह राजपूत धोनीचे आयुष्य जगला होता. यासाठी त्याला कठोर परिश्रम घ्यावे लागले होता. एका मुलाखतीत स्वतः सुशांतने सांगितले होते की, त्याने धोनी होण्यासाठी 13 महिन्यांचे प्रशिक्षण घेतले होते. इतकेच नव्हे तर त्याचे पात्र पडद्यावर हुबेहुब वठवण्यासाठी त्याने याकाळात तीनदा धोनीची भेट घेतली होती.

सुशांतने लाइव्ह मिंटला दिलेल्या या मुलाखतीतील महत्त्वाचा भाग...

  • धोनीबरोबरच्या साम्याविषयी...

मी एक उदाहरण देतो. मी लहान होतो तेव्हा दुपारी अभ्यास करावा लागायचा आणि संध्याकाळी 4:00-5: 30 चा वेळ खेळायचा असायचा. संपूर्ण दिवस यावेळेच्या अवतीभोवती फिरायचा. आम्ही कबड्डी, क्रिकेट, काहीही खेळायचो. तो दीड तास आमच्यासाठी 5 मिनिटांसारखा असायचा. धोनी आणि मी आमच्या आयुष्यातील 4:00–5: 30 वेळ असेच जगलो आहोत. यामुळे मला ओळख मिळाली.

  • अनेक तास धोनीकडे बघत राहिलो

क्रिकेट कौशल्यावर काम सुरू करण्यापूर्वी मी त्याला अनेक तास फक्त बघत राहिलो. माझा हेतू त्याच्या गोष्टी पिकअप करण्याचा होता. शूटच्या वेळी मला त्यांच्याबद्दल विचार करायचा नव्हता. मी 12 महिन्यांच्या तयारीत त्याला तीनदा भेटलो. पहिल्यांदा मी त्याला माझी कहाणी ऐकवली. दुस-यांदा माझ्याजवळ त्याला विचारण्यासाठी 250 हायपोथेटिकल मल्टिपल चॉईस प्रश्न होते. तिस-यांदा मी त्याला स्क्रिप्टबद्दल प्रश्न विचारले. जसे आपण आत्ता काय विचार करीत आहात? मी योग्य दिशेने जात आहे की नाही? हे मी त्याला विचारले.

  • किरण मोरे यांच्याकडे 13 महिन्यांचे प्रशिक्षण घेतले

मी किरण मोरे (माजी भारतीय विकेटकीपर) आणि व्हिडिओ विश्लेषक यांच्याकडून 13 महिन्यांचे प्रशिक्षण घेतले. मी 6 फ्रेममध्ये हेलिकॉप्टर शॉटचा सराव केला. ते (व्हिडिओ विश्लेषक) बॉलिंग मशीन एका जागी ठेवत असे आणि मी दिवसातून 300 वेळा हा शॉट खेळत असे. शॉट परिपूर्ण होईपर्यंत हा क्रम चालू राहायचा.

  • 2016 चा चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता 'धोनी'

'एम. एस. धोनीः द अनटोल्ड स्टोरी ' हा चित्रपट 30 सप्टेंबर 2016 रोजी प्रदर्शित झाला होता. त्यावर्षीचा हा चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. नीरज पांडे दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 133 कोटींची कमाई केली होती. अनुपम खेर, दिशा पाटनी आणि कियारा अडवाणी यांनीही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...