आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हीरोपंती 2':फिल्ममध्ये बुलेट ट्रेनच्या छतावर अ‍ॅक्शन करताना दिसणार टायगर, 7 दिवसांत लंडनचे शेड्यूल पूर्ण करुन सुरु करणार 'गणपत'चे शूटिंग

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'हीरोपंती 2'चे 75 टक्के शूटिंग पूर्ण झाले

टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'हीरोपंती 2' या चित्रपटाचे शूटिंग गेल्या एक महिन्यापासून लंडनमध्ये सुरु आहे. आता पुढच्या सात दिवसांत याचे शेड्यूल पूर्ण होईल. यानंतर टायगर लंडनमध्येच विकास बहलच्या आगामी 'गणपत' या चित्रपटाचे शूटिंग सुरु करणार आहे. 'गणपत'ची कथा आजपासून 69 वर्षांच्या पुढच्या दुनियेची आहे. या कथेतील टायगरचे पात्र खलनायक बनलेल्या नवाजला टक्कर देत भारत, लंडन आणि रशियासह अनेक देशाचा प्रवास करते.

15 दिवसांत शूट झाले बुलेट ट्रेनचे अ‍ॅक्शन दृश्य
'बागी 3' प्रमाणेच 'हीरोपंती 2' मध्येही अ‍ॅक्शन कोरिओग्राफी अहमद खानने केली आहे. याव्यतिरिक्त टीमने लंडनच्या काही को-ऑर्डिनेटर्सला हायर केले आहे. टायगरने 'बागी 2'मध्ये 400 बॉम्ब स्फोटांमध्ये अ‍ॅक्शन दृश्य चित्रीत केले होते, तर हीरोपंती 2 मध्ये तो दोन वेगाने धावणा-या बुलेट ट्रेनच्या छतावर उडी मारताना अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. टायगरने हे दृश्य बॉडी डबल आणि वायरची मदत न घेता केले आहे. एकमेव हे दृश्य शूट करण्यासाठी 15 दिवसांचा वेळ लागला.

75 टक्के शूटिंग पूर्ण झाले
शूटिंगची माहिती मिळवण्यासाठी दिव्य मराठीने चित्रपटाचा सिनेमॅटोग्राफर कबीर लालसोबत चर्चा केली. कबीरने सांगितले, 'हीरोपंती 2' चे आतापर्यंत 70 ते 75 टक्के भाग पूर्ण झाला आहे. मुंबईत याचे शूटिंग इनडोअर झाले होते. त्यानंतर याचा मोठा भाग लंडनमध्ये चित्रीत करण्यात आला. पुढच्या सात दिवसांत लंडनचे शेड्यूल पुर्ण होणार आहे. त्यानंतर आम्ही बँकॉक, चायना आणि रशियामध्ये याचे शूटिंग करणार आहोत. टायगर सध्या लंडनमध्येच आहे आणि येथो तो 'गणपत'चे शूटिंग सुरू करणार आहे.

लोकप्रिय अ‍ॅक्शन दृश्य

  • अजय देवगण - 'फुल और कांटे' ते 'तानाजी'पर्यंत अजयने धोकादायक स्टंट केले आहेत. दोन बाइकवर उभे राहण्याची त्याची एंट्री लोकप्रिय आहे.
  • अक्षय कुमार - 'खिलाडी' फ्रँचायझीमध्ये एकापेक्षा एक स्टंट केले. 'सिंग इज ब्लिंग'मध्ये त्याने आगामी उडी घेतली होती.
  • जॉन अब्राहम - 'फोर्स'मध्ये त्याने वायरची मदत न घेता अवजड बाइक उचलून घेतली होती.
बातम्या आणखी आहेत...