आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकाराशी गैरवर्तन प्रकरण:सलमान खानला मोठा दिलासा; मुंबई उच्च न्यायालयाने समन्सवरील स्थगिती 13 जूनपर्यंत वाढवली

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई उच्च न्यायालयाकडून सलमान खानला मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने 2019 ला पत्रकाराशी केलेल्या कथित गैरवर्तन प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने जारी केलेल्या समन्सवरील स्थगिती 13 जूनपर्यंत वाढवली आहे. वास्तविक सलमान शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने कोर्टात हजर राहू शकत नाही. फिजिकल अ‍ॅपिअरन्स टाळण्यासाठी सलमानने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात सलमानच्या अंगरक्षकाचेही नाव आहे.

अंगरक्षकानेही समन्सला आव्हान दिले
या वर्षी मार्चमध्ये, ट्रायल कोर्टाने सलमान आणि त्याचा अंगरक्षक नवाज शेख यांना 5 एप्रिल रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. या याचिकेला आव्हान देत सलमानने 5 एप्रिल रोजी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर उच्च न्यायालयाने समन्सला 5 मेपर्यंत स्थगिती दिली होती. यानंतर सलमानच्या अंगरक्षकानेही समन्सला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. ज्यावर कोर्टाने समन्सला स्थगिती 13 जूनपर्यंत वाढवली आहे.

काय प्रकरण आहे
ही घटना 3 वर्षे जुनी 2019 ची आहे. ज्यावर मुंबईच्या अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने सलमान आणि त्याच्या अंगरक्षकाला 5 मे रोजी कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. 2019 मध्ये सलमान सायकल चालवत असताना एका टीव्ही पत्रकाराने त्याची शुटींग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी सलमानने आपल्याला मारहाण व शिवीगाळ केली, असा आरोप पत्रकार अशोक पांडे यांनी केला आहे. सलमान खानने आपल्याला मारहाण केली व नंतर फोनही हिसकावून घेतला, असा आरोपदेखील पत्रकाराने केला आहे. तसेच, याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिल्यानंतरही तक्रारीवर काहीच कारवाई झाली नाही, असा आरोप करत पत्रकाराने न्यायालयात धाव घेतली होती. मुंबईच्या अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने सलमान खानवर आयपीसी कलम 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...