आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश:फाइव्ह स्टार हॉटेलमधून एका बॅले डान्सरसह दोन टीव्ही अभिनेत्रींना अटक, 10 लाखांत झाला होता सौदा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॅले डान्सरसह या दोन अभिनेत्रींनी हॉटेलमध्ये दहा लाखांचा सौदा केल्याचे सांगितले जात आहे.

मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये एका हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा भंडाफोड करण्यात आला आहे. वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी छापा टाकून तीन महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यातील एक तरुणी ही बॉलिवूडची आंतरराष्ट्रीय बॅले डान्सर असल्याचे सांगितले जात असून उर्वरित दोघी जणी या टीव्ही अभिनेत्री असल्याचा दावा केला जात आहे.

  • बॅले डान्सरवर वेश्याव्यवसाय केल्याचा आरोप

न्यूज 18 च्या वृत्तानुसार, बॅले डान्सरवर बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्रींना वेश्याव्यवसायात आणल्याचा आरोप आहे. ती या अभिनेत्रींची मोठ्या हॉटेल्समध्ये ग्राहकांसोबत डील करुन देत असल्याचा तिच्यावर आरोप आहे. पोलिसांनी तिच्याविरूद्ध देह व्यापाराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बॅले डान्सर आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करत असलेल्या या अभिनेत्रींनी हॉटेलमध्ये दहा लाखांचा सौदा केल्याचे सांगितले जात आहे.

  • पोलिसांनी खोट्या ग्राहकांना हॉटेलमध्ये पाठवले होते

शुक्रवारी सायंकाळी गुन्हे शाखेने आपल्या पथकाच्या काही सदस्यांना गोरेगाव येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये ग्राहक म्हणून पाठवले होते. या सदस्यांनी तेथील सेक्स रॅकेट डिलर्सची भेट घेतली. तेथे वेश्या व्यवसाय होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला आणि घटनास्थळावरून तीन महिलांना आपल्या ताब्यात घेतले.