आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुर्कीमध्ये आमिर:तुर्कीमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग जास्त, चित्रीकरणाचा खर्चही कमी : आमिर खान

इस्तंबूलहून भास्करसाठी मुनिरा खानएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
तुर्कीतील एक लोकेशन आणि हॉटेलमध्ये आमिरला चाहत्यांचा गराडा पडलेला असतो (चौकटीत) - Divya Marathi
तुर्कीतील एक लोकेशन आणि हॉटेलमध्ये आमिरला चाहत्यांचा गराडा पडलेला असतो (चौकटीत)
  • ‘लालसिंह चड्डा’च्या चित्रीकरणासाठी तीन लोकेशन ठरले, येथे बॉलीवूडप्रेमींची संख्या जास्त

बॉलीवूड अभिनेता आमिर खान यांच्या टीमने ‘लालसिंह चड्डा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तीन लोकेशन्स निवडली आहेत. पहिले इस्तंबूल, येथे जेम्स बाँडच्या स्कायफॉल चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. दुसरे इस्तंबूलपासून ७०० किमी दूर अंतरावर असलेले निदे शहराजवळील डेमिरकाजिक गाव बर्फाच्या शिळा व शिखरांसाठी प्रसिद्ध आहे. तिसरे लोकेशन अदाना हे आहे. इस्तंबूलमध्ये अनेक लोकेशन्सवर प्राचीन काळातील कथांचे चित्रीकरण केले जाऊ शकते. निदे गावातील परिसर शांत आहे. तलाव व हिरवळीने नटलेले लँडस्केप आहेत, तर अदाना ऐतिहासिक शहर आहे. येथे सफारीप्रेमी येतात. आमिरने सांगितले, चित्रीकरण भारतातील चंदीगड, अमृतसर व कोलकात्यातही होणार आहे.

आमिर इस्तंबूलच्या ज्या हॉटेलमध्ये थांबला आहे तेथे सांयकाळी लोकांची रांग लागलेली असते. त्याला भेटण्यासाठी आलेल्या चाहत्यांना तो कधी निराश करत नाही. आमिर हॉटेलातून बाहेर पडतो तेव्हा गर्दीतूनही ‘लव्ह यू आमिर’ असे चाहते ओरडताना दिसतात. आमिर तुर्कीला आल्याचे वृत्त सर्वत्र वेगाने पसरले आणि आमिर ज्या हॉटेलमध्ये थांबला होता तेथे गर्दी इतकी प्रचंड होती की, संपूर्ण निदे शहर तेथे जमल्यासारखे वाटत होते. विद्यार्थ्यांनी तीन दिवस हॉटेलबाहेरच मुक्काम ठोकला होता.

येथील सर्वात मोठी वृत्तपत्रे, हुरियत, सबाह, मिल्लत, जम्हुरियत आदी सर्व वृत्तपत्रे व वाहिन्यांवर आमिरखानची छायाचित्रे झळकत होती. आमिरचे ‘दंगल’, ‘थ्री इडियट्स’ व ‘ तारे जमीं पर’ तुर्कीमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरले. तिन्ही चित्रपट तुर्की भाषेतसुद्धा डब करण्यात आले होते. आमिरने इस्तंबूलमध्ये तुर्कीच्या प्रथम महिला अॅमिना एर्दोगन यांची भेट घेतली. त्यांना पाणी फाउंडेशनची माहिती दिली. तुर्कीमध्ये चित्रीकरणाचा खर्च कमी येतो. लोकेशन्स चांगली व फिजिकल डिस्टन्सिंग राखले जाते, असे आमिरने तेथील एका वाहिनीला सांगितले.

एक था टायगर, गेम, गुरू आदींचेही चित्रीकरण

तुर्कीमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे चित्रीकरण होते. जेम्स बाँडचा “स्कायफॉल’, ऑलिविअॅर मेगाटनचा ‘टेकन २’, जॅकी चेनचा ‘द अॅक्सिडेंटल स्पाय’, ‘हॅरी पॉटर अँड द ऑर्डर आॅफ फाॅनिक्स’चे चित्रीकरण येथे झालेले आहे. इतकेच नव्हे तर बॉलीवूडच्या ‘अजब प्रेम की गजब कहानी’, “एक था टायगर’, ‘गेम’, ‘रेस-२’, ‘गुरू’ आदी चित्रपटांचे चित्रीकरण तुर्कीमध्ये झालेले आहे. हॉलीवूड व बॉलीवूडच्या चित्रपटांसाठी तुर्की सुरुवातीपासूनच आवडते स्थळ आहे. पर्यटनासाठीही तुर्कीचा सहाव्या आवडत्या देशांत समावेश आहे. राज कपूरच्या ‘आवारा हंू’ या गीतांचे खूप चाहते येथे आहेत. कोलावरीचे रिमेक असो वा राणी मुखर्जीच्या ब्लॅकचे रिमेक असो , तुर्की बाॅलीवूडच्या जवळचे वाटते.

भारतात गदारोळ .. तर सरकार म्हणते, तो सांस्कृतिक दूत

आमिरने अॅमिना एर्दोगन यांची भेट घेतल्यावरून भारतात मोठा गदारोळ झाला. परंतु तुर्कीतील भारतीय राजदूत संजय पांडा यांनी आमिर हा भारताचा सांस्कृतिक दूत असल्याचे सांगितले. अॅमिनांच्या १६ ऑगस्टच्या टि्वटला रिटि्वट करताना हा उल्लेख केला आहे.

बातम्या आणखी आहेत...