आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगना विरुद्ध राऊत:वडिलांच्या विनंतीवरुन हिमाचल प्रदेश सरकारकडून कंगनाला सुरक्षा, मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांची माहिती

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 9 सप्टेंबर रोजी मुंबईत येणारच, असे सांगून तिने शिवसेना खासदार संजय राऊत यांना आव्हान दिले आहे.

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करून वादाच्या भोवऱ्यात सापडलेली अभिनेत्री कंगना रनोट हिला हिमाचल प्रदेश सरकारने सुरक्षा दिली आहे. याबाबत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी स्वत: माहिती दिली. कंगनाच्या वडिलांनी सरकारकडे विनंती केली होती, त्यामुळे आम्ही कंगनाला सुरक्षा दिली, असे जयराम ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगना रनोटला महाराष्ट्रात परत न येण्यास ठणकावले होते. त्यानंतर कंगनाने केंद्र आणि हिमाचल प्रदेश सरकारकडे सुरक्षेची मागणी केली होती. कंगनाच्या घरच्यांनी हिमाचल प्रदेश सरकारकडे कंगनाला सुरक्षा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी कंगनाला पूर्णपणे सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “कंगनाच्या वडिलांसोबत त्यांनी फोनवरुन संवाद साधला होता. हिमाचल सरकार कंगनाला पूर्ण सुरक्षा देईल, त्यासाठी प्रदेशच्या पोलिस महासंचालक तसे आदेश देण्यात आले आहेत. 9 सप्टेंबरला कंगना मुंबईला येणार आहे आणि हिमाचलच्या मुलीला सुरक्षा प्रदान करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”

  • कंगनाने व्हिडिओ केला होता जारी

कंगनाने रविवारी पुन्हा व्हिडिओ जारी करून वादात तेल ओतले. 9 सप्टेंबर रोजी मुंबईत येणारच, असे सांगून तिने शिवसेना खासदार संजय राऊत यांना आव्हान दिले. राऊत यांनी कंगनाला उद्देशून अपशब्द वापरला होता. त्याचा हवाला देऊन कंगना म्हणाली की, मला शिवी दिल्याने तुमची मानसिकताच दिसून आली. मुंबई पोलिस किंवा तुमच्यावर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान करते आहे असे होत नाही. तुम्ही (राऊत) म्हणजे महाराष्ट्र नाही. तुम्ही धमकी दिली तरीही 9 सप्टेंबरला मी येणारच आहे. राऊत यांनी मुलींचा अपमान केला असल्याचा आरोप करून ‘भारत की बेटियाँ’ तुम्हाला माफ करणार नाही, असे कंगना म्हणाली. देशात राहण्याची भीती वाटते, असे आमिर खान म्हणाला त्या वेळी त्याला कुणी शिवी दिली नाही, असे कंगनाने म्हटले आहे.

  • अहमदाबादबद्दल बोलशील का : संजय राऊत

मुंबईला तिने मिनी पाकिस्तान म्हटले आहे. अहमदाबादबद्दल असे वक्तव्य करण्याची हिंमत कंगना रनौतमध्ये आहे का, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तिने महाराष्ट्राची माफी मागितली तर माफ करण्याविषयी विचार करेन, असे ते म्हणाले.