आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Happy Birthday Hina khan:अभिनेत्री नव्हे तर हिनाला व्हायचे होते ‘हवाई सुंदरी’, एका मालिकेमुळे मिळाली आयुष्याला कलाटणी!

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावरून करिअरची सुरुवात करून मोठ्या पडद्यावर दबादबा निर्माण करणारी अभिनेत्री हिना खान हिचा आज 35 वा वाढदिवस आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' ही हिनाची पहिली मालिका होती. त्यात तिने केलेल्या भूमिकेने लोकांचे मन जिंकले. टीव्हीवर संस्कारी सूनच्या भूमिकेत दिसणारी हिनाचा लूक खूपच हॉट आणि ग्लॅमरल आहे. आज हिनाचा वाढदिवस असून तिच्या वैयक्तिक आणि व्यवहारीक आयुष्याविषयी आपण अधिकची माहिती घेणार आहोत.

हिना खानचा जन्म 2 ऑक्टोबर 1986 रोजी श्रीनगरमध्ये झाला. त्यानंतर तिने दिल्लीतील सीसीए स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. हिनाची पत्रकार होण्याची खूप इच्छा होती. मात्र, त्यानंतर ती एयरहोस्टेसचे स्वप्न पाहायला लागली. त्यासाठी तिने अप्लाय देखील केला होता.

मात्र, तिच्या नशिबात देवाने दुसरचं काहीतरी लिहलेलं होतं. एयरहोस्टेसच्या ज्वाइनिंग दरम्यान हिनाला मलेरिया झाला त्यामुळे तिला ट्रेनिंग अकॉडमीतून बाहेर पडावे लागले. त्यानंतर हिनाचे नशीब तिला 'ये रिश्ता क्या कहलाता है'च्या सेटवर घेऊन आले.

खरंतर हिना खानने कधीच अभिनयाचा इतका गंभीरपणे विचार केला नव्हता, पण एके दिवशी ती तिच्या मैत्रिणीसोबत 'ये रिश्ता क्या कहलाता है'च्या ऑडिशनला पोहोचली. जेव्हा हिनाला फोन आला की, तुमची शोमध्ये मुख्य भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे, तेव्हा हिनाला खूप आनंद झाला. अक्षराच्या भूमिकेत हिनाला चांगलीच पसंती मिळाली. त्याचबरोबर ती 'खतरों के खिलाडी 8' आणि 'कसौटी जिंदगी की 2' मध्येही दिसली होती. 'बिग बॉस 11'मध्ये हिना ट्रॉफी जिंकण्यापासून एक पाऊल दूर होती, पण तिला शोमध्ये चांगलीच पसंती मिळाली होती.

'ये रिश्ता...' ने हिनाला फक्त ओळखच दिली नाही तर तिला तिच्या जोडीदारासोबतही जोडले. शोदरम्यानच हिनाची रॉकी जैस्वालशी भेट झाली. रॉकी हा शोचा पर्यवेक्षक निर्माता होता आणि त्यांच्या मैत्रीचे सेटवर प्रेमात रुपांतर झाले. 'बिग बॉस 11' दरम्यान रॉकीने हिनाला प्रपोज केले होते. त्याचवेळी हिनाने 2020 मध्ये 'हॅक्ड' चित्रपटाद्वारे छोट्या पडद्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय तिने 'विश लिस्ट' आणि 'अनलॉक' सारख्या चित्रपटातही काम केले आहे आणि 'लाइन्स' चित्रपटाची निर्मितीही केली आहे.

हिना खानने तिच्या अभिनयासोबतच ग्लॅमरस लूकने लाखो चाहत्यांना भुरळ घातली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि इथे ती तिच्या चाहत्यांशी कनेक्टेड राहते. आज हिना तिचा वाढदिवस साजरा करत आहे.

बातम्या आणखी आहेत...