आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊन स्टोरी:विमानाचे जुने तिकिटे पाहून हिना खानला कोसळले रडू, लिहिले- 'आपण पुन्हा आपले पंख पसरवू'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॅग स्वच्छ करताना हिनाला तिचे एक जुने बोर्डिंग पास दिसले.

लॉकडाऊनमुळे देशात सर्व प्रकारच्या प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे कोणतीही व्यक्ती कोठेही जाऊ शकत नाही. हिना खान यामुळे अस्वस्थ झाली आहे. तिने एक व्हिडिओही शेअर केला आहे ज्यामध्ये ती जुने फ्लाइट तिकिट पाहून रडताना दिसतेय. हिना खानने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. यात हिना खान आपल्या बॅग्स स्वच्छ करताना दिसतेय, त्यातच तिला तिच्या एका बॅगमधून एक वस्तू सापडते  आणि ती बघून हिना खूपच भावनिक होते. ही वस्तू म्हणजे तिचे फ्लाइटचे एक जुने तिकिटे आहे. हे तिकिट बघून तिला खूप रडू कासळते. या सीनच्या बॅकग्राऊंडमध्ये 'जाने कहां गए वो दिन' हे गाणेही वाजत असल्याचे ऐकू येते. 

हा मजेदार व्हिडिओ शेअर करताना हिनाने लिहिले आहे, "आपला भूतकाळ कधीही आपल्याला सोडत नाही. लॉकडाऊन, प्रवासी निर्बंध आणि जगातील हे संक्रमण पाहून कुठलाही प्रवासी चिंताग्रस्त होऊ शकतो. जेव्हा बॅग स्वच्छ करताना मला माझे हे जुने बोर्डिंग पास दिसले, तेव्हा माझ्याबाबतीतही हे घडले आहे. आपण आपले पंख पुन्हा पसरवेपर्यंत आनंदी रहा'.

बातम्या आणखी आहेत...