आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिना खानचा प्रेमात विश्वासघात?:रॉकी जयस्वालने दिला धोका, पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने दिली ब्रेकअपची हिंट

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री हिना खान हिचा प्रेमात विश्वासघात झाला आहे. स्वतः हिनाने एक पोस्ट शेअर करत ब्रेकअपची हिंट दिली आहे. मागील 13 वर्षांपासून हिना रॉकी जयस्वालसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. रॉकीसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहते हिना आणि तिचा बॉयफ्रेंड यांच्या लग्नाच्या घोषणेचीही चाहते वाट पाहत होते, परंतु आता हिनाने चाहत्यांना एक मोठा धक्का दिला आहे.

गेल्या 13 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या हिना आणि रॉकी यांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. हिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत प्रेमात दगा मिळाल्याचे म्हटले आहे. पण या पोस्ट नेमक्या त्यांच्या ब्रेकअपशी संबंधित आहेत, की यामागे दुसरे कारण आहे, याबद्दल चर्चा सुरू आहेत, कारण काही वेळातंच तिने या स्टोरी डिलिट केल्या आहेत.

काय म्हणाली हिना?
हिनाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिले, 'विश्वासघात हे एक असे एकमेव सत्य आहे, जी टिकून राहते, 'betrayal is the only truth that sticks' असे हिनाने म्हटले आहे.

यानंतर तिने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे, त्यात तिने म्हटले, 'ज्या व्यक्तीने तुमच्या विश्वासघात केल्या, त्याच्यावर आंधळेपणानं विश्वास ठेवला, यासाठी स्वत:ला माफ करायलाही विसरू नका. अनेकदा चांगले मन वाईट गोष्टी पाहत नाही.' हिनाच्या या पोस्टनंतर रॉकीने तिचा विश्वासघात केल्याचा अंदाज वर्तवला जातोय.

हिना आणि रॉकीची भेट 'ये रिश्ता क्या केहलाता है'च्या सेटवर 2009 मध्ये झाली होती. तेव्हापासून दोघे एकत्र होते. पण आता दोघांचे मार्ग वेगळे झाल्याचे दिसून येतंय.

बातम्या आणखी आहेत...