आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:हिना खानने केली अंकिता लोखंडेची पाठराखण, शिबानी दांडेकरचा घेतला समाचार; नेटकरीही शिबानीला म्हणाले - तुझी फरहानमुळेच ओळख

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिया चक्रवर्तीच्या समर्थनात अंकिताच्या पोस्टवर शिबानी दांडेकर भडकली होती.
  • सुशांतसोबतचे नाते टिकवू शिकली नाही आणि प्रसिद्धीसाठी सर्वकाही करतेस, असे शिबानी अंकिताला उद्देशून म्हणाली होती.

ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर सुशांत सिंह राजपूतची माजी गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर फरहान अख्तरची गर्लफ्रेंड अभिनेत्री शिबानी दांडेकरने तिच्या पोस्टला अजब म्हणत रियाची बाजू घेतली होती. अंकिताला उत्तर देत शिबानीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, काल रात्री अंकिता लोखंडेने पोस्ट केलेल्या विचित्र पोस्टचे उत्तर, पितृसत्ताकच्या या राजकुमारीने स्वत: तर कधी सुशांतसोबतचे नाते स्वीकारले नाही आणि ते टिकवलेही नाही. आता मात्र 2 सेकंदांच्या प्रसिद्धीसाठी रियावर निशाणा साधत आहे. तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. याबरोबरच शिबानीने अंकितावर अनेकही आरोप लावले.

शिबानीच्या या वक्तव्यावर अंकिताने सडेतोड उत्तर दिले असून आता अनेक सेलिब्रिटींनी अंकिताला पाठिंबा दिला आहे. या वादामध्ये अभिनेत्री हिना खान हिनेदेखील उडी घेतली आहे. हिनाने अंकिताला पाठिंबा देत शिबानीला खडेबोल सुनावले आहेत.

  • हिना म्हणाली - अंकिताला 2 सेकंदांच्या प्रसिद्धीची गरज नाही

अंकिताची बाजू घेत हिनाने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. ''एक व्यक्ती जिने स्वत:च्या हिमतीवर कलाविश्वातील दोन्ही माध्यमांमध्ये स्वत:च स्थान निर्माण केले आहे. एक अशी मुलगी जिने शून्यापासून सुरुवात केली आणि आज लोकप्रिय टीव्ही स्टार झाली आणि पुढे अनेक यशस्वी चित्रपटांचा भाग झाली. त्या मुलीला खरंच 2 सेकंदाच्या प्रसिद्धीची गरज नाहीये. अंकिता लोखंडे तुझ्या हिमतीची आणि यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा. प्रत्येक ठिकाणी योग्य मान मिळालाच पाहिजे'', असे ट्विट हिनाने केले आहे.

  • नेटक-यांनाही घेतला शिबानीचा समाचार, म्हणाले - तुझी फरहानमुळेच ओळख

अंकितावर निशाणा साधल्यामुळे नाराज झालेल्या सोशल मीडिया युजर्सनी शिबानी दांडेकरचा समाचार घेतला. अंकिता तुझ्यापेक्षा जास्त प्रसिद्ध आहे. 50 वर्षांच्या फरहान अख्तरची गर्लफ्रेंड होण्याव्यतिरिक्त तुझी कोणतीच ओळख नाही. कदाचित तूच प्रसिद्धीसाठी तिच्याविषयी बोलत आहेस. यापूर्वीदेखील शिबानीने रियाच्या समर्थनात एक पोस्ट शेअर केली होती. त्यावरदेखील माेठ्या प्रमाणावर टीका झाली हाेती.

  • अंकिताने रियाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते

बुधवारी रात्री सुशांतची माजी गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने अभिनेत्याला ड्रग्ज देण्याच्या रियाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला होता. तिने विचारले होते, एकीकडे सुशांतची तब्येत ठीक नव्हती, त्याला थांबवण्याऐवजी तू त्याच्यासाठी ड्रग्जची व्यवस्था का करत होती? अंकिताने आरोप केला, तू सुशांतच्या कुटुंबीयांना त्याच्या ड्रग्जविषयी सांगितले नाही, कारण तू स्वतःच त्याचा आनंद घेत होतीस.

  • शिबानी म्हणाली होती - अंकिताला 2 सेकंदांची प्रसिद्धी हवी आहे

अंकिताच्या पोस्टचे उत्तर देत शिबानीने लिहिले होते, या महिलेला 2 सेकंदांची प्रसिद्धी हवी आहे. रियावर निशाणा साधत ती आपले काम करत आहे. कारण सुशांतसोबतही तिचे पटत नव्हते. त्यांच्या नात्यातही दुरावा आला होता. ती नाते टिकवू शकली नाही. तिला सर्वांसमोर आणणे आता फार गरजेचे आहे.

  • सुशांत रियावर प्रेम करत होता - शिबानी दांडेकर

शिबानीने अंकिताला उद्देशून लिहिले होते, पितृसत्ताक व्यवस्थेला ओळखण्याऐवजी अंकितासारख्या स्त्रिया त्याचे समर्थन करत आहेत आणि त्याचा वापर स्वार्थासाठी करून घेत आहेत. अंकिता, सुशांत रियावर प्रेम करत होता, हे तुला मान्य करावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...