आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सध्या हिंदी भाषेवरून वाद सुरू आहे. कन्नड स्टार किच्चा सुदीपने हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नसल्याचे म्हटले होते. यावर अजय देवगणने प्रत्युत्तर देत हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि कायम राहिलं, असे म्हटले होते. या वादावर अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय मंडळींनी आपली मतं मांडली होती. आता या वादावर गायतक सोनू निगमही व्यक्त झाला आहे.
नुकत्याच एका कार्यक्रमात सोनू निगमने या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाले, देशात नव्या समस्या तयार करण्याआधी ज्या समस्या आधीपासूनच आहेत, त्यावर उत्तरे शोधायला हवी. सोनू निगमपूर्वी मनोज बाजपेयी आणि सोनू सूद यांनीही या वादात आपली प्रतिक्रिया दिली होती.
हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, असे संविधानात कुठेही लिहिलेले नाही: सोनू
सोनू निगम एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. येथे बोलताना तो म्हणाला, "संविधानात कुठेही भारताची राष्ट्रभाषा हिंदी आहे असे लिहिलेले नाही. आपल्या देशात हिंदी ही सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. तामिळ ही सर्वात जुनी भाषा आहे. तामिळ आणि संस्कृतमध्येही यावरुन असा वाद अनेकदा होताना दिसतो. पण लोकांच्या मते तामिळ ही जगातील सर्वात जुनी भाषा आहे."
ही चर्चा का होत आहे?
सोनू पुढे म्हणाला, "देशात नव्या समस्या तयार करण्याआधी ज्या समस्या आधीपासूनच आहेत, त्यावर आपण उत्तरे शोधायला हवी. त्या समस्या सोडवण्याची आज जास्त गरज आहे. तुम्ही तामिळ आहात, तुम्ही हिंदी बोलता, असे बोलत तुम्ही तुमच्याच देशात शत्रू निर्माण करत आहात. हा युक्तिवाद चुकीचा आहे. कोणावरही भाषा लादू नये," असे मत सोनूने व्यक्त केले आहे.
ते लोक खूप पॅशनेट आहेत: मनोज
मनोज बाजपेयी एका मुलाखतीत म्हणाला होता, 'दाक्षिणात्य चित्रपट हिंदी डब केल्यावरही प्रचंड कमाई करतात, पण तिथेच बॉलिवूड चित्रपटांना प्रेक्षक मिळत नाहीये. 'केजीएफ 2', आरआरआर' आणि 'पुष्पा' सारखे चित्रपट हिंदी डब केल्यावरही 300 कोटींचा पल्ला गाठतात. पण तिथेच 'सूर्यवंशी'ला 200 कोटी कमावणे अवघड होऊन बसले. या चित्रपटांकडून बॉलिवूडने काहीतरी शिकले पाहिजे. ते सगळे पॅशनेट आहेत, ते प्रत्येक शॉट असा देतात जसे जगाचा सर्वोत्तम शॉट देत आहेत. प्रत्येक फ्रेम त्यांच्या डोक्यात आधीच फिट असते. ते दर्शकांवर काहीच थोपत नाहीत. ते प्रेक्षकांवर प्रेम करतात. आम्ही इथेच चूक करतो. आम्ही चित्रपटांना फक्त पैसे कमावण्याचे साधन बनवले आहे. आम्ही त्यांना वाईट म्हणू शकत नाही तर आम्ही त्यांना वेगळे म्हणून मोकळे होतो. पण त्यांचे चित्रपट हे मुंबईमधील दिग्दर्शक आणि निर्मात्यांना एक शिकवण आहे की चित्रपट कसे बनवावे.'
देशाची एक भाषा आहे आणि ती म्हणजे मनोरंजन : सोनू सूद
यासोबतच या वादात बोलताना सोनू सूद म्हणाला की, "केवळ हिंदीलाच या देशाची राष्ट्रभाषा म्हणता येणार नाही. या देशाची एक भाषा आहे आणि ती म्हणजे मनोरंजन. तुम्ही कोणत्या इंडस्ट्रीतून आहात याने कुणालाही काही फरक पडत नाही. जर तुम्ही लोकांचे मनोरंजन कराल तर लोक तुमच्यावर प्रेम करतील आणि तुम्हाला स्वीकारतील."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.