आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडमध्ये लग्न:कोरिओग्राफर पुनीत पाठकने  बेस्ट फ्रेंड निधी मूनी सिंगसोबत थाटले लग्न, लोणावळ्यात झाली वेडिंग सेरेमनी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुनीत म्हणाला - जास्त लोकांना आमंत्रित करू शकले नाही याची खंत आहे

'एबीसीडी' मध्ये अभिनेता म्हणून काम करणा-या कोरिओग्राफर पुनीत जे पाठकचे निधी मुनी सिंगसोबत लग्न झाले आहे. 11 डिसेंबर रोजी लोणावळा (मुंबई) येथे त्यांचा लग्न सोहळा संपन्न झाला. पुनीत आणि निधीच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पुनीत फिकट गुलाबी रंगाच्या शेरवानीमध्ये तर निधीने गुलाबी रंगाचा लहेंगा परिधान केला आहे.

पुनीत-निधी अडीच वर्षांपासून एकमेकांना ओळखतात
पुनीत जे पाठक आणि निधी मुनी सिंग हे जवळपास अडीच वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. लग्न लोणावळ्यातील एका रिसॉर्टमध्ये झाले आणि दोन दिवस त्यांचा लग्नसोहळा चालला. कोरोना साथीच्या आजारामुळे लग्नाला अगदी मोजके पाहुणे उपस्थित होते. कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांच्यासह मोजक्या मित्रांनी लग्नाला उपस्थिती लावली होती.

जास्त लोकांना आमंत्रित करू शकले नाही याची खंत आहे
एका मुलाखतीत पुनीत म्हणाला की, "आमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी लोकांनी आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढला, याचा मला आनंद आहे. मात्र जास्त लोकांना लग्नात आमंत्रित करु शकलो नाही, याची खंत देखील आहे."

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser