आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमध्ये रिमेकचा ट्रेंड:'दुर्गामती' असो किंवा 'हेरा फेरी' आणि 'दृश्यम', हे 30 गाजलेले बॉलिवूड चित्रपट आहेत दाक्षिणात्य चित्रपटांचा हिंदी रिमेक

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक गाजलेल्या दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी रिमेक बनवले गेले आहेत.

अलीकडेच अक्षय कुमार आणि किआरा आडवाणी स्टारर 'लक्ष्मी' या चित्रपटाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे. हा चित्रपट ओटीटीवर सर्वाधिक बघितला गेलेला भारतीय चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट 'कांचना' या दाक्षिणात्य चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. यापूर्वी देखील अनेक गाजलेल्या दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी रिमेक बनवले गेले आहेत.

दुर्गामती - भूमी पेडणेकरचा 'दुर्गामती' हा चित्रपट 11 डिसेंबर रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट 'भागमती' या तेलगू-तामिळ चित्रपटाच्या हिंदी रिमेक आहे.
मुळ हॉरर-थ्रिलर चित्रपटात अनुष्का शेट्टी मुख्य भूमिकेत होती.

कबीर सिंह- शाहिद कपूर आणि किआरा अडवाणी स्टारर 'कबीर सिंह' हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट 2017 साली रिलीज झालेल्या 'अर्जुन रेड्डी' या दाक्षिणात्य
चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात विजय देवर-कोंडा आणि शालिनी पांडे मुख्य भूमिकेत होते.

शुभ मंगल सावधान - 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शुभ मंगल सावधान' या विनोदी चित्रपटात अष्टपैलू अभिनेता आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकर महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले. हा
चित्रपट 'कल्याणम समायाल साधन' या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. मूळ चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता.

हेरा फेरी - 'हेरा फेरी' या क्लासिक विनोदी चित्रपटाने प्रेक्षकांना खूप हसवले. 2000 साली रिलीज झालेला हा चित्रपट 'रामजी राव स्पीकिंग' या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.
हा मल्याळम चित्रपटदेखील 1971 च्या टेली फिल्म 'द मॅन रन' या कथेवर आधारित आहे.

भूल भुलैया - अक्षय कुमार आणि विद्या बालन स्टारर 'भूल भुलैया' हा चित्रपट 1993 मध्ये आलेल्या मणिचित्राथाजू या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रीमेक आहे. या चित्रपटाचा तामिळ रिमेक 'चंद्रमुखी' 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता. तसेच त्याचा बंगाली रीमेक 'राजमोहल' हा देखील 2005 साली रिलीज झाला होता. ‘भूल भुलैया’चा सिक्वेलही पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे, ज्यात कार्तिक आर्यन आणि किआरा आडवाणी मुख्य भूमिकेत आहेत.

नायक - एक दिवसाचा मुख्यमंत्री बनून प्रेक्षकांची मने जिंकणारा अनिल कपूर यांचा 'नायक' हा चित्रपट जबरदस्त हिट ठरला होता. हा चित्रपट 1999 मध्ये आलेल्या ‘मुधालवम’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे, ज्यामध्ये ए.आर. रहमान यांनी संगीत दिले होते. हिंदी रिमेकमध्ये रहमान यांच्या कंपोझिनला हिंदी लिरिक्टसह घेण्यात आले.

दृश्यम - 2015 मध्ये हा आलेला हा चित्रपट हिट ठरला होता. हा 2013 मध्ये आलेल्या 'दृश्यम' या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. याशिवाय हा चित्रपट 2014 मध्ये कन्नडमध्ये 'दृश्या' या नावाने, तर 2014 मध्ये तेलुगुत बनवला गेला होता. याशिवाय 2015 मध्ये 'पापनाशम' या नावाने तामिळमध्येही हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

हे देखील दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी रिमेक आहेत

हिंदी रीमेकओरिजनल
1गजनी
गजनी (तामिळ)
2एक दीवाना थाविनयथंडी वरुवाया (तेलुगू)
3

तेरे नाम

सेथू (तामिळ)
4विरासतथेवर मगन (तामिळ)
5सदमामूद्रम पिराई (तामिळ)
6जुडवाहॅलो ब्रदर (तेलुगू)
7साथियाअलाइपयूथे (तामिळ)
8राम और श्याम
रामडू- भीमडू (तेलुगू)
9वाँटेड

पोकिरू (तेलुगू)
10रेडीरेडी (तेलुगू)
11हाउसफुल 2मत्तूपेटी मचन (मल्याळम)
12रहना है तेरे दिल में
मिन्नाले (तामिळ)
13अनजाना अनजानीथिलू श्रावणी सुब्रह्मण्यम (तेलुगू)
14दे दना दनवेत्तम (मल्याळम)
15युवाअयुथा एजुथू (तामिळ)
16बीवी नं 1साथी लीलावती (तामिळ)
17जुदाईशुभ लग्नम (तेलुगू)
18वो सात दिनअत्था एजू नाटकल (तामिळ)
19सूर्यवंशमसूर्यवम्शम (तामिळ)
20गरम मसालाबोइंग- बोइंग (मल्याळम)
21बिल्लू काथापरायुमबोल (मल्याळम)
22बॉडीगार्डबॉडीगार्ड (मल्याळम)
23फोर्सकाखा-काखा (तामिळ)
24सिंघमसिंघम (तामिळ)

बातम्या आणखी आहेत...