आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपटावरुन वादंग आणखीन वाढले:हिंदु सेनेने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांना पत्र सोपवले, म्हणाले - शीर्षक बदलले नाही तर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चित्रपटाचे शीर्षक बदलले नाही तर उच्च न्यायालयात धाव घेऊ, असे विष्णू गुप्ता यांनी म्हटले आहे.

अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी यांचा आगामी चित्रपट 'लक्ष्मी बॉम्ब' हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडला आहे. या चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शक यांच्याविरोधात हिंदू सेनेने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहिले आहे. पत्रात त्यांनी चित्रपटाला आपला कडाडून विरोध दर्शवला आहे.

या चित्रपटातून देवीचा अपमान केला जातोय. सोबतच लव्ह जिहादला प्रोत्साहन दिले जात असून जर आम्ही सांगितलेले बदल केले नाहीत, तर हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित होऊ देणार नाही, असे हिंदू सेनेने म्हटले आहे. या पत्रात चित्रपटाचे शीर्षक बदलण्याचे सांगण्यात आले आहे. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहिले आहे. या चित्रपटाचे शीर्षक बदलले नाही तर उच्च न्यायालयात धाव घेऊ, असेही विष्णू गुप्ता यांनी म्हटले आहे.

लव्ह जिहादला प्रोत्साहन दिल्याचा आरोप
चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अक्षयच्या विरोधात #ShameOnAkshayKumar ट्विटरवर ट्रेंड झाले होते. राघव लॉरेन्स दिग्दर्शित या चित्रपटात अक्षयच्या पात्राचे नाव आसिफ असून त्याचे प्रिया (कियारा अडवाणी) या हिंदू मुलीशी लग्न झाले आहे. इतकेच नाही तर या चित्रपटाच्या नावात ‘लक्ष्मी’ हा शब्द असल्याने काही प्रेक्षक संतापले आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय कुमारने हिंदू देवतांचा अपमान केला आहे, असे काहींचे मत आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी काही प्रेक्षक करत आहेत.

9 नोव्हेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होतोय

9 ऑक्टोबर रोजी चित्रपटाचा ट्रेलर समोर आला होता. हा चित्रपट कांचना या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. यापूर्वी 22 मे 2020 रोजी चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोना लॉकडाऊनमुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले. आता हा चित्रपट 9 नोव्हेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होईल.

बातम्या आणखी आहेत...