आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड होळी 2021:करीना कपूर ते रणवीर सिंह, या सेलिब्रिटींनी टाळली धुळवड

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सेलिब्रिटींमध्ये होळी खेळण्याची परंपरा अभिनेता राज कपूर यांच्यापासून सुरु झाली आहे

बॉलिवूड सेलेब्सच्या घरात होळी हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. प्रत्येक सेलेब्सना होळी या सणाचे प्रचंड आकर्षण आहे. यामध्ये फिल्म इंडस्ट्रीमधील नामांकित लोक सहभागी होतात. परंतु, काही सेलेब्स असे आहेत, जे या उत्सवापासून स्वत:ला दूर ठेवतात. जाणून घेऊया अशा सेलिब्रिटींबाबत...

करीना कपूर-खान
होळी पार्टीचा ट्रेंड हा अभिनेता राज कपूर यांच्यापासून सुरु झाला असून ते आरके स्टूडिओमध्ये होळीदरम्यान मोठ्या पार्ट्याचे आयोजन करायचे. या पार्श्वभूमीवर ते इंडस्ट्रीमधल्या सर्व परिवारांना जमा करायचे. परंतु, ते मरण पावल्यावर कपूर घराण्याने तेव्हांपासून होळी खेळण्याचे बंद केले. अभिनेत्री करिना कपूर यांचे म्हणणे आहे की, होळीचे रंग दादा राज कपूरसोबत गेले आहे.

रणवीर सिंह
अभिनेता रणवीर सिंह हे पद्मावत आणि रासलीला-रामलीला मध्ये होळी खेळताना दिसतात. परंतु, तो खर्‍या आयुष्यात होळी साजरा करत नाही. त्याने 2019 मधे दिलेल्या एका मुलाखती दरम्यान स्वच्छतेची चिंता असल्यामुळे होळी खेळत नसल्याचे म्हटले होते.

करण जोहर
अभिनेता करण जोहर हा अभिषेक बच्चनमुळे होळी खेळत नसल्याचे एका शो दरम्यान सांगितले होते. लहानपणी अमिताभ बच्चन यांच्या घरी होळी पार्टीला गेले होते. त्याला रांगोबरोबर खेळणे आवडत नाही पण घरी पोहोचताच अभिषेक त्याला रंगांनी भरलेल्या तलावात ढकले. यामुळे करणला इतकी भीती वाटते की त्याने वयाच्या दहाव्या वर्षापासून आजपर्यंत होळी खेळली नाही.

जॉन अब्राहम
अभिनेता जॉन अब्राहमने एका मुलाखतीदरम्यान, "मी होळी साजरा करत नाही. लोक होळीचा दुरुपयोग करतात आणि ते निरुपयोगी करतात. म्हणूनच मी अशा उत्सवांचा आदर करत नाही." असे म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...