आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडमध्ये कोरोना:'हॉलिडे' फेम फ्रेडी दारूवालाच्या वडिलांना कोरोना संसर्ग, वडील होम आयसोलेशनमध्ये, अभिनेत्याला आता 15 महिन्यांच्या मुलाची वाटतेय काळजी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अक्षय कुमार स्टारर 'हॉलिडे: अ सोल्जर इज नेवर ऑफ ड्यूटी' या चित्रपटात फ्रेडी दारूवाला मुख्य खलनायकाच्या भूमिकेत झळकला होता.

अभिनेता फ्रेडी दारूवालाच्या वडिलांची कोविड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) त्यांचा बंगला सील केला आहे. अक्षय कुमार स्टारर 'हॉलिडे: अ सोल्जर इज नेवर ऑफ ड्यूटी' (2014) च्या खलनायकाच्या रुपात फ्रेडीला अधिक ओळखले जाते. एका संभाषणात त्याने आपल्या वडिलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची पुष्टी केली. सोबतच 15 महिन्यांच्या मुलाबद्दल काळजी वाटत असल्याचेही त्याने म्हटले आहे.

सुरुवातीला सीझनल फ्लूसारखी लक्षणे आढळली

फ्रेडीच्या म्हणण्यानुसार, त्याच्या वडिलांना सुरुवातीला ताप आणि अंगदुखीसारखी सीझनल फ्लूची लक्षणे दिसली. याविषयी तो म्हणाला, "सुरुवातीला आम्ही या लक्षणांना गांभीर्याने घेतले नाही.  तिसर्‍या - चौथ्या दिवशी मला वाटले की सध्याची परिस्थिती लक्षात घेता त्यांची तपासणी केली पाहिजे. काही दिवसांपूर्वीच एक रिपोर्ट आला, ज्यामध्ये त्यांची कोरोनाव्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आली."

म्हणून घरी ठेवण्याचा निर्णय घेतला

फ्रेडी पुढे म्हणाला, "बीएमसीने सल्ला दिला की वडिलांना आम्ही अशा ठिकाणी ठेवू शकतो जिथे ब-याच खोल्या आणि वॉशरूम आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना घरीच ठेवले आहे. कारण आम्हाला वाटले की रुग्णालय एखाद्या गरजू व्यक्तीसाठी उपयोगी पडेल."

फ्रेडी दारूवालाला आपल्या मुलाची चिंता आहे

बीएमसीने दारूवालाच्या बंगल्याबाहेर क्वारंटाईन बोर्ड बसविला असून सील करण्यापूर्वी परिसर सॅनिटाइज केला आहे. फ्रेडीने सांगितले की, वडिलांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात त्यांना काहीच अडचण नाही. कारण त्याच्या बंगल्यात बर्‍याच खोल्या आहेत. पण तो आता आपल्या 15 महिन्यांच्या मुलाबद्दल काळजीत पडला आहे.

बातम्या आणखी आहेत...