आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलीवूडला भारत पसंत:हॉलीवूड आता चित्रीकरण वाढवेल अन् देशी पात्रेही, कोरोनावरून अमेरिका आणि चीन यांच्यातील वादाचा फायदा भारताला

न्यूयॉर्कएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलीवूड चित्रपट टेनेंटचे दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन मुंबईत चित्रीकरणाच्या वेळी. - Divya Marathi
हॉलीवूड चित्रपट टेनेंटचे दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन मुंबईत चित्रीकरणाच्या वेळी.
  • भारतात चित्रपट उद्योग व प्रेक्षकांची क्षमता बघून चित्रपट डबिंगचे बजेट केले दुप्पट

जगातील दुसरा सर्वात मोठा चित्रपट उद्योग हॉलीवूडला भारत आवडला आहे. भारतीय बाजाराची क्षमता ओळखून हॉलीवूड त्यांची व्याप्ती वाढवेल. आगामी काळात हॉलीवूड चित्रपटात केवळ भारतीय कलाकार आणि पात्रेच वाढणार नाहीत, तर त्यांच्या चित्रीकरणातही वाढ होईल. हॉलीवूडचे प्रख्यात दिग्दर्शक आणि स्टुडिओ चित्रीकरणासाठी भारतात जायला आणि भारतीय प्रेक्षकांच्या दृष्टीने चित्रपट करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर काश्मीर, मुंबई, जयपूर, दिल्ली, कोलकाता, गोवा, एमपीसह अनेक पर्याय चित्रीकरणासाठी आहेत.

अमेरिकेने कोरोनासाठी चीनला जबाबदार धरल्याने तेथील लोकांनी हॉलीवूड चित्रपटांपासून तोंड फिरवले आहे, तर क्रिस्टोफर नोलन यांचा ‘टेनेट’ आणि सुपरहीरो चित्रपट ‘वंडर वुमन’च्या नंतर हॉलीवूडला भारतीय बाजाराची ताकद लक्षात आली आहे. कोरोनामुळे अमेरिकेत चित्रपटगृह बंद असताना भारतात प्रदर्शित या चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला. टेनेटचे बॉक्स ऑफिस कलेक्शन १२.४३ कोटी आणि वंडरवुमनचे १५.५४ कोटी रुपये झाले.

नोलन यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ‘टेनेट’ चित्रपटातील काही दृश्यांचे चित्रीकरण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालय आणि ताजमहाल पॅलेसमध्ये केले. चित्रपटाला भारतीय टच देण्यासाठी ‘प्रिया’ नावाच्या पात्राला विशेष करून जागा दिली. प्रियाची भूमिका करणारी डिम्पल कपाडियाचे नाव पाेस्टरवरही होते. चित्रपटाने महामारीच्या काळात जगात २६०० कोटींचा व्यवसाय केला.

७० टक्के कमाई विदेशातून, चीनचा वाटा ५० टक्के
हॉलीवूड चित्रपटांच्या २०१९ मध्ये झालेल्या कमाईत ७०% वाटा विदेशातील होता. १९९१मध्ये ३०% वाटा होता, तर २०१९ च्या कमाईत चीनचा वाटा ५०% पेक्षा जास्त होता. ‘अॅव्हेंजर्स : एंडगेम’ने चीनमध्ये ३० हजार कोटींपेक्षा जास्त कमावले. यामुळे महामारीतून बाहेर येण्यासाठी हॉलीवूड चीनवर अवलंबून होता.

२०१५मध्ये बॉक्स ऑफिसमध्ये हॉलीवूडचा वाटा ८%, तो २०१९ मध्ये २१% झाला.२०१८ मध्ये भारतातून ९२१ कोटी कमावले. ते २०१९मध्ये वाढून १२२० कोटी. दोन वर्षांत कमाई १५-१६०० कोटींपर्यंत जाऊ शकते.

भारतातील बहुतांश प्रादेशिक भाषांमध्ये होत आहे डबिंग
हॉलीवूड स्टुडिओंनी भारताच्या बहुभाषी मार्केटमध्ये व्याप्ती वाढवण्यासाठी प्रादेशिक भाषांमध्ये चित्रपटांच्या डबिंगचे बजेट दुप्पट केले आहे. बहुतांश हॉलीवूड चित्रपटांचे सबटायटल व डबिंग भारतीय प्रादेशिक भाषांत होत आहे.

पुढील महिन्यात भारतात जेम्स बाँडचा चित्रपट ‘नो टाइम टू डाय’ येईल. मे महिन्यात ‘ब्लॅक विडो’ व फॉस्ट अँड फ्यूरिस मालिकेतील ‘एफ ९’, जुलैत टॉम क्रूझचा ‘टॉप गन : मेवेरिक’ प्रदर्शित होईल. ‘मोर्टार कॉम्बॅट’, ‘ए क्वाइट पॅलेस : पार्ट- २’, ‘गॉडझिला व्हर्सेस कांग’, ‘द कन्झ्युरिंग’ ही याच काळात येतील.

भारतीय चित्रपट उद्योगाचे वार्षिक बजेट ३.७ अब्ज डॉलर
हॉलीवूडचा प्रमुख चित्रपट निर्मात्यांचा स्टुडिओ वॉर्नर ब्रदर्सच्या प्रवक्त्याने सांगितले, आम्ही या वर्षअखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारतात चित्रीकरणाची योजना आखत आहोत. तेथे चित्रीकरण वाढवण्याबरोबरच चित्रपटात भारतीय पात्र आणि ओळख प्रामुख्याने ठेवणार. वॉर्नर ब्रदर्स वर्षात १०० पेक्षा जास्त चित्रपट बनवतो.

बातम्या आणखी आहेत...