आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कंगनाची डोकेदुखी वाढणार:ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात आता कंगना रनोटची होणार चौकशी, गृहमंत्र्यांचे मुंबई पोलिसांना आदेश

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यासंदर्भात एक पत्र मुंबई पोलिसांना पाठवण्यात आले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोटच्या अडचणी कमी होण्याची सध्या चिन्ह दिसत नाहीयेत. मुंबईस्थित ऑफिसमधील अनधिकृत बांधकामावर हातोडा पडल्यानंतर आता कंगनाच्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांना दिले आहेत. यासंदर्भात एक पत्र मुंबई पोलिसांना पाठवण्यात आले आहे.

कंगना ड्रग्ज घेत असल्याचा दावा अभिनेता शेखर सुमनचा मुलगा आणि अभिनेता अध्ययन सुमनने एका मुलाखतीत केला होता. त्याबाबतची चौकशी मुंबई पोलिस करतील, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

अध्ययन सुमनने चार वर्षांपूर्वी दिलेली एक मुलाखत पुन्हा व्हायरल झाली आहे. त्यात कंगनाने आपल्याला कोकेन घेण्याचा आग्रह केल्याचा दावा अध्ययनने केला आहे. 'आपण हॅश ट्राय केले होते, पण ते आवडले नव्हते, त्यामुळेच आपण कोकेन घेण्यास नकार दिला होता. कोकेन घेण्यास नकार दिल्यामुळे कंगनाचे आणि माझे कडाक्याचे भांडणही झाले होते, त्यानंतर कंगनाने मारहाण केली होती,' असेही अध्ययनने या मुलाखतीत सांगितले होते.