आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनी सिंग आणि शालिनी तलवार यांचा घटस्फोट:साकेत कौटुंबिक न्यायालयात खटल्याची सुनावणी, गायकाने 1 कोटी दिली पोटगी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबी गायक यो यो हनी सिंग आणि पत्नी शालिनी तलवार यांचा घटस्फोट झाला आहे. दिल्लीच्या साकेत जिल्हा न्यायालयाच्या कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी केली. हनी सिंगने एक कोटी रुपयांचा धनादेश शालिनी तलवारला सीलबंद लिफाफ्यात दिला आहे.

1 कोटीच्या पोटगीवर खटला निकाली निघाला
यो यो हनी सिंग आणि शालिनी तलवार यांच्यातील उलट-सुलट आरोपानंतर गुरुवारी न्यायालयात हे प्रकरण मिटले. त्यानंतर दोघांमध्ये 1 कोटींच्या पोटगीचा करार झाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 मार्च 2023 रोजी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये पुढील प्रस्तावावर सुनावणी होणार आहे.

हनी सिंगवर मारहाणीचा आरोप केला होता
शालिनी तलवारने हिरदेश सिंग म्हणजेच हनी सिंग विरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत गेल्या वर्षी 3 ऑगस्ट रोजी तीस हजारी न्यायालयात याचिका दाखल केली होती. तिने हनी सिंगवर मारहाणीचा आरोप केला होता. या लग्नाला 10 वर्षे दिली आणि त्याबदल्यात फक्त शारीरिक आणि मानसिक छळ मिळाल्याचे शालिनीने म्हटले होते.

शालिनीने केली होती 10 कोटी रुपयांची मागणी
शालिनी तलवारने हनी सिंगवर आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर जाण्याच्या बहाण्याने इतर महिलांशी अवैध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केला होता. शालिनीने सांगितले की, तिच्या पतीने तिला जनावरासारखी वागणूक दिली आणि आता तिला हनी सिंगपासून वेगळे व्हायचे आहे. याचिका दाखल करताना शालिनीने हनी सिंगकडे 10 कोटी रुपयांच्या पोटगीची मागणीही केली होती.

हनी सिंग आणि शालिनी तलवार यांचे 2011 मध्ये लग्न झाले होते.
हनी सिंग आणि शालिनी तलवार यांचे 2011 मध्ये लग्न झाले होते.

17 वर्षे डेटिंग केल्यानंतर 2011 मध्ये केले होते लग्न
17 वर्षे डेट केल्यानंतर हनी सिंग आणि शालिनी तलवार यांनी 23 जानेवारी 2011 रोजी लग्न केले होते. दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते आणि एकाच शाळेत शिकत होते. आता त्याच्या पत्नीने लग्नाच्या 10 वर्षानंतर हनी सिंगवर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता.

हनी सिंगने शालिनीचे आरोप फेटाळून लावले
शालिनीच्या आरोपानंतर हनी सिंगने 6 ऑगस्टला सोशल मीडियावर एक नोट शेअर केली होती. ज्यामध्ये त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. हनी सिंगने या नोटमध्ये लिहिले होते की, 'माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले ही अत्यंत दुःखाची बाब आहे. या आरोपांमुळे मी खूप अस्वस्थ आहे. माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप निंदनीय आहेत आणि ते केवळ मला त्रास देण्यासाठी करण्यात आले आहेत,' असे हनी म्हणाला होता.

बातम्या आणखी आहेत...