आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादात हनी सिंग:प्रकृती अस्वस्थामुळे कोर्टात हजर झाला नाही हनी सिंग, पत्नीने लावला होता मारहाण आणि अनेक महिलांसोबत संबंध असल्याचा आरोप

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • न्यायालयाने हनी सिंगला चांगलेच फटकारले आहे.

बॉलिवूड गायक आणि रॅपर यो यो हनी सिंग विरोधात त्याची पत्नी शालिनी तलवारने घरगुती हिंसाचाराविरोधात दिल्लीतील तीस हजारी कोर्टात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणावर आज दिल्लीतील तीस हजारी कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीला हनी सिंगला हजर राहायचे होते, मात्र प्रकृती ठिक नसल्याचे कारण देत तो या सुनावणीला अनुपस्थित राहिला. त्यामुळे न्यायालयाने त्याला चांगलेच फटकारले आहे.

शालिनी तलवारने दाखल केलेल्या घरगुती हिंसाचार प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान हनी सिंगच्या वकिलांनी त्यांची प्रकृती ठिक नसल्याचे कारण देत तो सुनावणीला अनुपस्थित असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे पुढच्या सुनावणीला तो आवर्जुन हजर राहील, असे आश्वासन देखील हनी सिंगच्या वकिलांनी दिले. यावरून न्यायालयाने हनी सिंगला फटकारले आणि हनी सिंगचे मेडिकल रिपोर्ट आणि आयटी रिटर्न सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे.

पत्नीने केले गंभीर आरोप
शालिनी तलवार यांनी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात ‘कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, 2005’ अंतर्गत याचिका दाखल केली आहे. या 120 पानांच्या याचिकेत शालिनीने अनेक खुलासे केले आहेत. तिने केवळ पती हनी सिंगच नव्हे तर सासू भूपिंदर कौर, सासरे सरबजीत सिंग आणि वहिनी स्नेहा सिंग यांच्यावरही आरोप केले आहेत.

शालिनीने हनी सिंगचे अनेक महिलांशी संबंध असल्याचा दावा केला आहे. तिने सांगितल्यानुसार, 'ब्राऊन रंग दे'च्या शूटिंगदरम्यान हनीला एका मुलीसोबत नको त्या अवस्थेत रंगेहात पकडल्यानंतर त्याने तिच्यावर दारूची बाटली फेकली होती.

शालिनीने सांगितले की, सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर हनी सिंग पॅनिक झाला होता आणि शालिनीने फोटो लीक केल्याचा आरोप करत तिला बेदम मारहाण केली होती. शालिनी म्हणाली की, हनी सिंगने हे केले कारण त्याला त्याच्या वैवाहिक जीवनाचे अस्तित्व लपवायचे होते. शालिनी म्हणाली की, हनीने तिला जनावरांसारखी वागणूक दिली.

10 कोटींची नुकसानभरपाई मागितली
नवरा हनी सिंग आणि त्याच्या कुटुंबीयांनी अनेकदा माझा शारीरिक, शाब्दीक, मानसिक आणि भावनिक छळ केला असा आरोप शालिनीने केला आहे. नवऱ्याने आपल्याला अनेकदा मारहाण केली. तो आणि त्याचे कुटुंबीय मला शारीरिक इजा पोहोचवतील या भितीच्या छायेखाली मी सतत वावरत होते, असे शालिनीने सांगितले. इतकेच नाही तर दिल्लीत घरभाड्यापोटी हनी सिंगला दर महिन्याला 5 लाख रुपये देण्याचेही आदेश द्यावेत, अशी मागणी तिने याचिकेत केली आहे.

20 वर्षांच्या मैत्रीनंतर केले होते लग्न
हनी सिंग आणि शालिनी यांचे लग्न 2011 मध्ये दिल्लीतील एका गुरुद्वारात झाले होते. 2014 मध्ये हनी सिंगने इंडियाज रॉकस्टार या शोच्या एका एपिसोडमध्ये शालिनीला जगासमोर आणत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला हो. बॉलिवूडमधील अनेक मेगा प्रोजेक्ट्समध्ये काम करण्यापूर्वीच हनी सिंगचे लग्न झाले होते.

बातम्या आणखी आहेत...