आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारॅपर हनी सिंग पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. अलीकडेच तो त्याच्या लेडी लव्हसोबत स्पॉट झाला. हनी त्याची नवीन गर्लफ्रेंड टीना थडानीसोबत दिल्लीतील एका कार्यक्रमात पोहोचला. यादरम्यान तो संपूर्ण वेळ टीनाचा हात हातात धरुन दिसला.
हनीने अधिकृत केले नाते
हनीने गर्लफ्रेंड टीनासोबत पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी एकत्र हजेरी लावली. अशाप्रकारे त्याने आपल्या या नात्यावर सार्वजनिकरित्या शिक्कामोर्तब केले आहे. या कार्यक्रमात हनी सिंग व्हाइट शर्ट, ब्लॅक पँट आणि ब्लेझरमध्ये दिसला. तर टीना ब्लॅक कलरच्या हाय स्लिट ड्रेसमध्ये दिसली. यादरम्यान टीनाच्या हातात जी हँडबॅग होती, त्याची किंमत अडीच लाख असल्याचे नेटक-यांनी सांगितले आहे.
नवीन मैत्रिणीसाठी खूप शुभेच्छा - नेटकरी
हनी आणि टीनाला एकत्र पाहून सोशल मीडिया यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले, 'भावा नवीन मैत्रिणीसाठी शुभेच्छा.' तर आणखी एकाने लिहिले, 'नवीन मैत्रिणीची ओळख करून द्यायची होती, म्हणूनच घटस्फोट झाला.'
2011 मध्ये झाले होते हनीचे पहिले लग्न
हनी सिंग आणि शालिनी यांचे लग्न 2011 मध्ये झाले होते. 2014 मध्ये हनी सिंगने इंडियाज रॉकस्टार या रिअॅलिटी शोच्या एका एपिसोडमध्ये आपल्या पत्नीची ओळख सगळ्यांना करून दिली होती. बॉलिवूडच्या मेगा प्रोजेक्टमध्ये काम करण्याआधीच हनीने लग्न केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. 20 वर्षांच्या मैत्री आणि प्रेमानंतर हनीने शालिनीशी लग्न केले होते.
2021 मध्ये झाला होता हनीचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट
हनी सिंगने 2021 मध्ये पत्नी शालिनी तलवारपासून घटस्फोटाची घोषणा केली होती. यादरम्यान शालिनीने हनी आणि त्याच्या कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केले होते. शालिनीने सांगितले होते की, हनी सिंगचे अनेक महिलांशी संबंध होते. दुसरीकडे हनी सिंगने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. रॅपरच्या पत्नीचा आरोप होता की, तिला एखाद्या जनावरासारखे वागवले जाते. शालिनी तलवारने आपल्या याचिकेत सासू भूपिंदर कौर, सासरे सरबजीत सिंग आणि जाऊ स्नेहा सिंग यांचीही नावे घेतली होती. शालिनीने हनी सिंगकडे 10 कोटींची पोटगी मागितली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.