आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागायक आणि रॅपर यो यो हनी सिंगने त्याची गर्लफ्रेंड टीना थडानीसोबत नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. या निमित्ताने हनीने टीनासोबतचा एक रोमँटिक व्हिडिओ शेअर केला असून चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये हनी सिंग त्याच्या गर्लफ्रेंड टीनासाठी 'मेरी जान...मेरी जान' हे गाणे गाताना दिसत आहे. दुसरीकडे, टीना देखील हनीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे.
हा प्रेमवीरांचा सीझन आहे, द्वेष करणाऱ्यांचा नाही
हा व्हिडिओ शेअर करत हनी सिंगने कॅप्शनमध्ये लिहिले, 'सर्व रसिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हा प्रेमवीरांचा सीझन आहे, द्वेष करणाऱ्यांचा नाही.' हनीचा हा व्हिडिओ समोर आल्यापासून चाहते आणि सेलिब्रिटी त्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत.
हनीच्या पॅरिस गाण्यात झळकली टीना
टीना हनी सिंगचे नवीन गाणे 'पॅरिस का ट्रिप'मध्ये झळकली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दोघेही दिल्लीतील एका कार्यक्रमात एकत्र स्पॉट झाले होते, तेव्हापासून त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. स्वतः हनीनेदेखील त्यांचे नाते अधिकृत केले आहे.
गेल्या वर्षी मार्चमध्ये झाली होती हनी आणि टीनाची भेट
हनी सिंगने अलीकडेच एका मुलाखतीत टीनाबद्दल सांगितले होते. हनीने सांगितले की, गेल्या वर्षी मार्चमध्ये तो टीनाला भेटला होता. यासोबतच टीनाला आयुष्यात आणण्यासाठी अनेक महिने तिचा पाठलाग करावा लागल्याचा खुलासाही हनीने केला होता. सोबतच मी टीनासोबत खूप आनंदी असून जेव्हा मी पहिल्यांदा तिला पाहिले तेव्हा ती केवळ माझ्यासाठीच बनली आहे, असे वाटले होते, अशी कबुलीदेखील हनी सिंगने दिली.
शालिनीशी तुटले नाते
हनी सिंगने 2011 मध्ये शालिनी तलवारसोबत लग्न केले होते. शालिनी तलवारने 2021 मध्ये दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता आणि पतीवर घरगुती हिंसाचार आणि इतर महिलांसोबत शारीरिक संबंधांसह अनेक गंभीर आरोप केले होते. रिपोर्ट्सनुसार, शालिनीने हनी सिंगकडून घटस्फोटाच्या बदल्यात सुमारे 10 कोटी रुपयांची पोटगी मागितली होती, परंतु तिला पोटगी म्हणून 1 कोटी रुपये देण्यात आले आहेत. गायकाने न्यायालयात पोटगीचा एक कोटी रुपयांचा धनादेश सीलबंद कव्हरमध्ये शालिनीला दिला होता.
माझा नवरा माझ्यावर अत्याचार करतो, माझे मानसिक आणि आर्थिक शोषण करतो असे शालिनीने तक्रारीत म्हटले होते. हनी सिंगच्या आईवडील आणि छोट्या बहिणीनेही आपल्यावर अत्याचार केले होते, असे शालिनी म्हणाली होती. एके दिवशी ती रूममध्ये कपडे बदलत होती तेव्हा तिचे सासरे दारूच्या नशेत खोलीत शिरले होते. सासऱ्यांनी चुकीच्या ठिकाणी स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही शालिनीने केला होता. तसेच हनी सिंगचे लग्नानंतरही अनेक महिलांशी अवैध संबंध असल्याचे आणि तो त्यांच्यासोबत सेक्स करायचा, असे धक्कादायक आरोप तिने केला होता.
हनी सिंग आणि शालिनी यांची भेट शाळेत शिकत असताना झाली होती. इथून दोघांच्या मैत्रीला सुरुवात झाली आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. 10 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 14 मार्च 2010 रोजी हनी आणि शालिनीने घरच्यांच्या संमतीने साखरपुडा केला. त्यानंतर 23 जानेवारी 2011 रोजी सरोजनी नगरमधील गुरुद्वारामध्ये लग्न केले होते. परंतु, हनी सिंगने जवळपास 4 वर्षे आपल्या लग्नाबद्दलची माहिती लपवून ठेवली होती. दोघांच्या लग्नाबद्दल चाहत्यांना कळाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांच्यातील वादाच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या. 2022 मध्ये न्यायालयाने दोघांचा घटस्फोट मंजुर केला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.