आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादात हनी सिंग:यो यो हनी सिंगची पत्नी शालिनीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली - कपडे बदलत असताना सासरे मद्यधुंद अवस्थेत रुममध्ये आले आणि...

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हनी सिंगचे अनेक महिलांशी संबंध असल्याचा आरोप

रॅपर हनी सिंगवर त्याची पत्नी शालिनी तलवारने घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात ‘कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, 2005’ अंतर्गत याचिका दाखल केली आहे. या 120 पानांच्या याचिकेत शालिनीने अनेक खुलासे केले आहेत. तिने केवळ पती हनी सिंगच नव्हे तर सासू भूपिंदर कौर, सासरे सरबजीत सिंग आणि वहिनी स्नेहा सिंग यांच्यावरही आरोप केले आहेत.

शालिनीने सास-यांवर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. शालिनीने सांगितल्यानुसार, ती कपडे बदलत असताना हनी सिंगचे वडिल मद्यधुंद रुममध्ये आले होते. ते इतक्यावरच थांबले नाहीत तर, त्यांनी शालिनीच्या छातीवर हात फिरवायला सुरुवात केली, असा खुलासा तिने केला आहे.

हनी सिंगचे अनेक महिलांशी संबंध असल्याचा आरोप
शालिनीने हनी सिंगचे अनेक महिलांशी संबंध असल्याचा दावा केला आहे. तिने सांगितल्यानुसार, 'ब्राऊन रंग दे'च्या शूटिंगदरम्यान हनीला एका मुलीसोबत नको त्या अवस्थेत रंगेहात पकडल्यानंतर त्याने तिच्यावर दारूची बाटली फेकली होती.

शालिनीने सांगितले की, सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर हनी सिंग पॅनिक झाला होता आणि शालिनीने फोटो लीक केल्याचा आरोप करत तिला बेदम मारहाण केली होती. शालिनी म्हणाली की, हनी सिंगने हे केले कारण त्याला त्याच्या वैवाहिक जीवनाचे अस्तित्व लपवायचे होते. शालिनी म्हणाली की, हनीने तिला जनावरांसारखी वागणूक दिली.

10 कोटींची नुकसानभरपाई मागितली
नवरा हनी सिंग आणि त्याच्या कुटुंबीयांनी अनेकदा माझा शारीरिक, शाब्दीक, मानसिक आणि भावनिक छळ केला असा आरोप शालिनीने केला आहे. नवऱ्याने आपल्याला अनेकदा मारहाण केली. तो आणि त्याचे कुटुंबीय मला शारीरिक इजा पोहोचवतील या भितीच्या छायेखाली मी सतत वावरत होते, असे शालिनीने सांगितले. इतकेच नाही तर दिल्लीत घरभाड्यापोटी हनी सिंगला दर महिन्याला 5 लाख रुपये देण्याचेही आदेश द्यावेत, अशी मागणी तिने याचिकेत केली आहे.

25 दिवसांच्या आत हनी सिंगकडून उत्तर मागितले
हनी सिंगच्या पत्नीने त्याच्याकडे नुकसान भरपाईपोटी 10 कोटी रुपयाची मागणी केली आहे. मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी तानिया सिंग यांनी हनी सिंगला नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये नोएडामध्ये दोघांच्या मालकीच्या संयुक्त संपत्तीमध्ये तिसऱ्या पक्षकाराला अधिकार देऊ नका तसेच पत्नीचे दागिने आणि अन्य वस्तु विकू नका असे निर्देश दिले आहेत. शालिनी तलवारच्या वकीलाने ही माहिती दिली आहे. न्यायालयाने हनी सिंगला 28 ऑगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याची नोटीस बजावली आहे.

बातम्या आणखी आहेत...